---Advertisement---

खुशखबर! इंग्लंडनंतर आता या देशात होणार क्रिकेटचे पुनरागमन

On: बुधवार, जुलै 15, 2020 10:55 AM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे न्यूझीलंडचे क्रिकेटपटू जवळपास बऱ्याच महिन्यांनंतर आता या आठवड्यात लिंकन येथे उच्च परफॉरमन्स सेंटरमध्ये सराव करण्यास सुरुवात करणार आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये ६ राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन केले जाणार असल्याचे न्यूझीलंड क्रिकेटने सोमवारी (१३ जुलै) सांगितले.

न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले, “न्यूझीलंडचे अव्वल पुरूष आणि महिला क्रिकेट या आठवड्यात लिंकन येथे उच्च परफॉरमन्स सेंटरमध्ये सराव करणार आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये आयोजित केले जाणाऱ्या ६ राष्ट्रीय शिबिरांपैकी हे पहिले शिबीर असणार आहे.”

“दक्षिण बेट आणि वेलिंग्टनमध्ये राहणारे पुरूष आणि महिला खेळाडू या आठवड्यात कॅन्टरबरी येथे सराव करण्यासाठी परतणार आहेत. यानंतर खेळाडूंसाठी दुसरे मोठे शिबीर १९ जुलैपासून माऊंट माउंगनुईच्या बे ओव्हल येथे आयोजित केले जाणार आहे,” असेही त्यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरसचा (Corona Virus) प्रभाव कमी असणाऱ्या देशांमध्ये न्यूझीलंडचा समावेश आहे. तिथे कोरोनाची जवळपास १५०० प्रकरणे समोर आली आहेत. त्यामध्ये १४०० पेक्षा अधिक लोक बरे झाले आहेत. आतापर्यंत तिथे कोरोना व्हायरसमुळे केवळ २२ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-या भारतीय क्रिकेटरचा मुलगा राहतो जंगलात; वाघांवर आहे विशेष प्रेम

-वनडे विश्वचषकात बलाढ्य संघांना भारी पडलेले ५ कमकुवत संघ

-पाकिस्तानचा ‘हा’ दिग्गज खेळाडू म्हणतोय, मला प्रशिक्षक बनवा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---