दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित २० षटकात १७२ धावा केल्या. पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ येत असताना न्यूझीलंडचा पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू झाला. क्रिकेट चाहत्यांनीही न्यूझीलंड क्रिकेट संघावर विनोद करायला सुरुवात केली.
न्यूझीलंडने साखळी फेरीत भारताचा पराभव केला होता. ज्यानंतर चाहत्यांना वाटत होते की यावेळी न्यूझीलंड संघ विजेतेपद पटकावेल. पण पुन्हा एकदा न्यूझीलंडला मोठ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर असे मीम्स शेअर केले आहेत, जे पाहून कुणालाही हसू आवरता येणार नाही.
#NewZealand #KaneWilliamson #toss
World Cup to Newzealand cricket team pic.twitter.com/vb4V8i92As— sugar kane ☯️????♀️ (@vegetarianmee) November 14, 2021
एका चाहत्याने स्वर्ग चित्रपटातील एक दृश्यावर मिम बनवले, त्यात त्याने न्यूझीलंडसाठी लिहिले की, ‘ना हे स्वतः जिंकतात, ना भारतीय संघाला जिंकू देत, याला क्षमा करू?.’ हे संवाद विराटच्या तोंडी त्याने दाखवले असल्याने ते खूप गमतीदार वाटते.
https://twitter.com/smileandraja/status/1459935118416568320?s=20
दुसऱ्या एका चाहत्याने वॉर्नर आणि विल्यम्सन यांच्यातील द्वंदावर बोट ठेवताना, दबंग चित्रपटातील संवाद वापरला आहे. त्यात डेविड वॉर्नर म्हणतो, ‘दुष्मनी आहे, बदला तर घेऊच.’
Warner against Williamson #AusVsNZ pic.twitter.com/9ymxzfQKue
— Dr. Strange 3.0 (@humour_kichad) November 14, 2021
अजून एका चाहत्याने मिरझापुर या प्रसिद्ध मालिकेचा संवाद वापर म्हटले आहे की, ‘न्यूझीलंड जिंकणे महत्त्वाचे नाही, तर ऑस्ट्रेलिया हरणे महत्त्वाचे आहे.’ अशा अनेक मिम्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
Congratulations on your sixth WC Australia ???????? #AUSvNZ #T20WorldCupFinal pic.twitter.com/DapGkvOSbv
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 14, 2021
Dharmasena Selfie × NZ Wc Defeats#T20WorldCupFinal #AUSvNZ #Aussies #Australia #Williamson #Kiwis #JAKE #Warner #MitchellMarsh #MEMES #NewZealand #CongratulationsAustralia pic.twitter.com/iaJ542B4uR
— Riktam (@Riktam11) November 15, 2021
दरम्यान, प्रथम फलंदाजी करतांना न्यूझीलंडने ४ बाद १७२ धावा केल्या. केन विल्यमसनने ८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १८.५ षटकांत २ गडी राखून लक्ष्य गाठले. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अॅरॉन फिंच अवघ्या ५ धावा करून माघारी परतला, त्याला ट्रेंट बोल्टने बाद केले. १५ धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर मिचेल मार्श आणि डेविड वॉर्नर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. मिचेल मार्शने ७७ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय डेविड वॉर्नरनेही ५३ धावा केल्या. वॉर्नरने ३८ चेंडूत ५३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेलने २८ धावांची उपयुक्त खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
चँपियन ऑस्ट्रेलियाला चाहत्यांकडून ‘गार्ड ऑफ हॉनर’, बँड बाजाच्या आवाजाने चढवली रंगत; व्हिडिओ व्हायरल
मॅक्सवेलचा मॅच विनिंग चौकार अन् वॉर्नरने स्मिथला मारली मिठी, पाहा ऑस्ट्रेलियाचा विनिंग मूमेंट






