---Advertisement---

नया है ये…! न्यूझीलंडच्या प्रेक्षकाने चक्क स्वतः बनवला पाकिस्तानी खेळाडूंच्या चुकांचा स्कोर बोर्ड

On: सोमवार, डिसेंबर 28, 2020 7:21 PM
---Advertisement---

क्रिकेटची पर्वणी असलेल्या बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) पासून न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. या सामन्यात न्‍यूझीलंड संघाने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानवर पूर्णतः दबाव बनवलेला आहे. मात्र या सामन्यात खेळापेक्षा एका प्रेक्षकाने केलेल्या कृतीची चर्चा संपूर्ण क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. न्यूझीलंडच्या एका प्रेक्षकाने पाकिस्तानी खेळाडूंनी केलेल्या चुकांबद्दल एक फलकच तयार केलेला आहे.

न्युझीलंडच्या एका प्रेक्षकाने न्यूझीलंडच्या डावातील 94 व्या षटकात एक फलक झळकावला. या फलकामध्ये त्याने पाकिस्तानी खेळाडूंनी सोडलेले झेल, मिस फिल्ड, खराब थ्रो आणि डीआरएसचा केलेला खराब वापर यांचे आकडे मांडले आहेत. या प्रेक्षकाच्या फलकानुसार पाकिस्तान संघाने एकूण 2 झेल, 6 मिस फिल्ड, 18 खराब थ्रो आणि 2 वेळा चुकीच्या डीआरएसचा वापर केला आहे. काही वेळातच या प्रेक्षकाचा हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात व्हायरल झाला असून, त्यामुळे पाकिस्तानी संघाची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.

दरम्यान सामन्याचा विचार केला असता, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून, न्‍यूझीलंड संघाने 192 धावांची आघाडी मिळवली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्युझीलंड ने 431 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 239 धावांवर बाद झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशीच न्युझीलंड कडे विजय मिळवण्याची उत्तम संधी आहे.हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की न्युझीलंड संघ चौथ्या दिवशीच विजय मिळवतो अथवा नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

तुझं वजन जरा २० ते २५ किलो जास्तच! वेडचे पंतला मजेदार स्लेजिंग, पाहा व्हिडिओ

अजबच आहे बाबा! बुमराहने स्टंपवरील बेल्स उडवल्या तरी स्मिथला तपास नाही, पाहा व्हिडिओ

‘दादा’ फसला की, त्याचे खापर फोडायचे ‘नगमा’वर आणि त्याच्यापाठीमागे होतं ‘हे’ विशेष कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---