न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने १३ जून रोजी आपला ३१ वा वाढदिवस साजरा केला आहे. त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो आपल्या वेगाने मोठ्या फलंदाजांना त्रास देत असतो. २०१७ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्याच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला होता. पण अशी एक वेदना त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला दिली आहे, हे आजही विराट विसरला नसेल
न्यूझीलंडने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत केले, त्या संघात लॉकी फर्ग्युसनचा संघात समावेश होता, त्याने त्या सामन्यात एक बळीही घेतला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २३९ धावा केल्या. प्रतिउत्तरात भारतीय संघ २२१ धावांवर गारद झाला. तथापि, न्यूझीलंडचा संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला. अंतिम सामन्यात त्याचा इंग्लंडकडून बाऊंड्री काऊंट नियमानुसारने पराभव झाला.
पण हा विश्वचषक लॉकी फर्ग्युसनसाठी संस्मरणीय होता. त्याने २१ विकेट घेतल्या आणि सर्वांत जास्त विकेट घेण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याने संघासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
गर्लफ्रेंडला सांगितले की, गमावण्यास काहीच नाही
अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा संघ केवळ २३९ धावा करू शकला. भारतीय संघाकडे चांगल्या फलंदाजीची फळी होती. त्याबद्दल लॉकी फर्ग्युसनने सांगितले की “माझ्या गर्लफ्रेंडने विचारले की ही धावसंख्या पुरेशी आहे का? मग मी म्हणालो की आमच्याकडे हरण्यासाठी काहीच उरले नाही आहे. तो म्हणाला की ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्रीने त्यांच्या कारकिदीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली आणि आम्हालाही संस्मरणीय विजय मिळवून दिला.’
सामन्यात मॅट हेन्रीने तीन आणि ट्रेंट बोल्टने दोन गडी बाद केले. आयसीसी जागतिक कसोटी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड पुन्हा एकदा सामना करणार आहेत. दोन्ही देशांमधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे.
५१ आंतरराष्ट्रीय सामन्यात ९३ बळी
लॉकी फर्ग्युसनने आतापर्यंत एक कसोटी, ३७ एकदिवसीय आणि १५ टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. त्याला कसोटीत विकेट मिळालेली नाही. त्याने एकदिवसीय सामन्यात ६९ विकेट्स आणि टी -20 सामन्यात २५ बळी घेतले आहेत. तो आयपीएलमध्ये पुणे आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. त्याच्या एकूण टी -२० कारकीर्दीबद्दल बोलताना त्याने १०९ सामन्यात १२४ बळी घेतले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा