काल (8 फेब्रुवारी) ऑकलँड येथे न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे(2nd ODI) सामना पार पडला. 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले. तसेच 2-0ने विजय मिळवत मालिका खिशात घातली.
असे असतानाही, या सामन्यात न्यूझीलंड संघावर षटकांची गती कमी (Slow Over Rate) राखल्याने आयसीसीकडून दंड आकारण्यात आला आहे. इडन पार्कमध्ये(Eden Park) खेळलेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाला निर्धारित वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल सामना शुल्काच्या 60 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.
आयसीसी आचार संहितेच्या कलम 2.22 नुसार सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड (Chris Broad) यांना न्यूझीलंड संघ दोषी आढळला. त्यामुळे न्यूझीलंड संघावर सामना शुल्काच्या 60 टक्के रकमेचा दंड ठोठावला.
झाले असे की, न्यूझीलंड संघाने निर्धारित वेळेत 3 षटके कमी टाकल्यामुळे संघावर प्रत्येकी 1 षटकासाठी 20 टक्के दंड या हिशोबाने 60 टक्के दंड ठोठावण्यात आला.
यावेळी सामन्यानंतर न्यूझीलंडचा प्रभारी कर्णधार टॉम लाथमने(Tom Latham) आपली चूक कबूल करत आयसीसीने दिलेली शिक्षा मान्य केली आहे.
या सामन्यात मैदानावर उपस्थित पंच ब्रुस ऑक्सनफोर्ड (Bruce Oxenford), ख्रिस ब्राऊन(Chris Brown) आणि तिसरे पंच (थर्ड अंपायर) लॅंग्टन रुसेरे (Langton Rusere) यांनी न्यूझीलंड संघावर षटकांची गती कमी राखल्याचा आरोप केला होता, असे आयसीसीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिकेत षटकांची गती कमी राखल्याने दंड देण्यात येण्याची ही न्यूझीलंडची प्रथमच वेळ आहे. मात्र, न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्या शेवटच्या 2 टी20 सामन्यात आणि पहिल्या वनडे सामन्यात (two successive T20s followed by first ODI) भारताला षटकांची गती कमी राखल्याने आयसीसीकडून दंड आकारण्यात आला होता.
मार्टिन गप्टीलने केली सचिन तेंडुलकरच्या 'त्या' विक्रमाशी बरोबरी…
वाचा- 👉https://t.co/xCt3SVYcEa👈#म #मराठी #Cricket #INDvsNZ @Martyguptill @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020
…आणि सचिन तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची जर्सी घालून उतरला फलंदाजीला, पहा व्हिडिओ
वाचा- 👉 https://t.co/cWg5uP2VE4👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @sachin_rt— Maha Sports (@Maha_Sports) February 9, 2020