---Advertisement---

आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठे बदल, आॅस्ट्रेलियाला मागे टाकत हा संघ तिसऱ्या स्थानावर

On: बुधवार, एप्रिल 4, 2018 5:55 PM
---Advertisement---

काल न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात न्यूझीलंड संघाला यश आले. त्यामूळे आज हा संघ पारंपारीक प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलियाला मागे सारत कसोटी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी आला आहे. 

त्यांचे आणि आॅस्ट्रेलियाचे सारखेच गुण होते परंतू काही दशांश गुणाच्या फरकाने न्यूझीलंडने तिसऱ्या स्थानी झेप घेतली. 

न्यूझीलंडचे सध्या कसोटीत १०२.२६३ तर आॅस्ट्रेलियाचे १०२.२०० गुण आहेत. आॅस्ट्रेलिया संघाला दक्षिण आफ्रिकेत जो ३-१ पराभव पहावा लागला यामुळेही त्यांच्या संघाला आपले स्थान गमवावे लागले. 

३ एप्रिल ही आयसीसीच्या बक्षिस रकमेची ‘कट आॅफ डेत’ अर्थात अंतिम तारीख असल्यामुळे या क्रमवारीचा न्यूझीलंडला मोठा फायदा झाला आहे. त्यांना आता तिसऱ्या क्रमांकाचे $200,000 मिळणार आहेत तर आॅस्ट्रेलियाला $100,000 मिळणार आहेत. 

आॅस्ट्रेलिया संघाला दक्षिण आफ्रिकेत  ३-१ने  पराभूत झाल्यामूळे याचा फायदा दक्षिण आफ्रिकेला झाला असून दुसऱ्या क्रमांकाचे त्यांना $500,000 आहेत तर अव्वल स्थानी असणाऱ्या भारतीय संघाला यापुर्वीच कसोटी चॅंपीयनशीपची गदा आणि तब्बल $10,00,000 दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात देण्यात आले होते. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment