---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी ‘हा’ दिग्गज खेळाडू असणार न्यूझीलंडचा गोलंदाजी प्रशिक्षक, मुंबई इंडियन्सची आहे खास नातं

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 1:23 AM
---Advertisement---

ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी (१७ ऑगस्ट) स्पर्धेचे वेळापत्रक देखील जाहीर केले. यापूर्वीच न्यूझीलंडच्या संघाने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला होता. अशातच न्यूझीलंडकडून आणखी एक बातमी समोर आली आहे.

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बॉन्ड टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाचा चौथा प्रशिक्षक असणार आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “आम्हाला संघासाठी बॉन्डचा अनुभव फायदेशीर ठरेल. बॉन्डने याच्या आधी ही २०१२ ते २०१५ पर्यंत न्यूझीलंड संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. सोबतच २०१९ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका टी-२० सामन्यात देखील बॉन्डने गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. त्याने न्यूझीलंड ‘अ’ संघासोबत देखील काम केले आहे. २०१५ च्या विश्वचषक स्पर्धेनंतर बॉन्डने प्रशिक्षक पदावरून निवृत्ती घेतली होती.”

बॉन्डकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे. याचा फायदा न्यूझीलंड संघाला होऊ शकतो. अशी आशा स्टीडने केली आहे. शेन बॉन्ड आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्स देखील गोलंदाजी प्रशिक्षक आहे. त्यामुळे आयपीएलनंतर बॉन्ड विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक म्हणून सामील होणार आहेत. त्यांचा यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमधील अनुभव न्यूझीलंड संघाला उपयोगी पडू शकतो.

पुढे बोलताना स्टीड म्हणाले, बॉन्ड न्यूझीलंडच्या क्रिकेट संघासोबत गेल्या खूप काळापासून काम करत आहे. नुकतेच एका प्रशिक्षण शिबिरात देखील बॉन्डने सहभाग नोंदवला होता. त्यामुळे बॉन्ड अनेक खेळाडूंना वैयक्तिक पातळीवर ओळखतात. त्यामुळे या टी-२० विश्वचषकात त्यांना खेळाडूंसोबत जास्त अडचण येणार नाही.

बॉन्डने न्यूझीलंड खेळताना १८ कसोटी सामने, ८२ एकदिवसीय सामने आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी एकूण २५९ विकेट घेतल्या आहेत. दरम्यान टी-२० विश्‍वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ ‘ब’ गटात आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा पहिला सामना २६ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला भारतीय संघाबरोबर न्यूझीलंडचा सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –
खेळाडू आणि चाहत्यांनी एकत्र येत लॉर्ड्स कसोटी दरम्यान रूथ स्ट्रॉस फाऊंडेशनसाठी गोळा केला इतक्या कोटींचा निधी
टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताची पहिलीच लढत पाकिस्तानविरुद्ध; अशी असेल स्पर्धेची रूपरेखा
तिसऱ्या कसोटीत ‘या’ दिग्गज खेळाडूला मिळणार टीम इंडियातून डच्चू?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---