बुधवारी (दि. 1 नोव्हेंबर) वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 32वा सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात खेळला जाणार आहे. हा सामना पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, 2 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक न्यूझीलंड संघाचा कर्णधार टॉम लॅथम याने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला.
या सामन्यात न्यूझीलंड संघात मोठा बदल झाला आहे. लॉकी फर्ग्युसन याच्या जागी टीम साऊदी याची संघात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका संघातही एक बदल आहे. तबरेज शम्सी याच्या जागी कागिसो रबाडा याला सामील केले आहे.
स्पर्धेतील कामगिरी
उभय संघांची विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील कामगिरी पाहायची झाली, तर दोन्ही संघ चांगली कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिका संघाने 6 सामने खेळले असून त्यातील फक्त 1 सामना गमावला आहे, तर 5 सामने जिंकले आहेत. ते 10 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाने 6 सामने खेळले असून त्यातील 2 सामने गमावले, तर 4 सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघ पॉईंट्स टेबलमध्ये 8 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट
दक्षिण आफ्रिका
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी (New Zealand have won the toss and have opted to field against south africa cwc23)
हेही वाचा-
शमीच्या दोनच सामन्यातील कामगिरीने ऑस्ट्रेलियन दिग्गज इम्प्रेस, म्हणाला, ‘शमीने आता सिराजची…’
ऑस्ट्रेलियासाठी 526 विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची भविष्यवाणी; म्हणाला, भारत आणि ‘या’ संघात होणार वर्ल्डकप फायनल