भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या जगातील उत्कृष्ट गोलंदाजांमध्ये गणला जात आहे. बुमराहच्या अनोख्या गोलंदाजीच्या स्टाईलमुळे (Bowling Style) तो प्रसिद्धीस येत आहे. तसेच तो सर्व क्रिकेट प्रकारात सध्या प्रभावी गोलंदाज म्हणूनही ओळखला जात आहे.
26 वर्षीय बुमराहच्या या यशामुळे, त्याचे चाहते भारतातच नव्हे तर, संपूर्ण जगभरात आहेत. अशाच प्रकारे बुमराहच्या गोलंदाजीचे अनुकरण करणाऱ्या न्यूझीलंडच्या एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत दिसते आहे की, तो मुलगा खेळपट्टीवर धावत आहे आणि स्टेप बाय स्टेप बुमराहप्रमाणे गोलंदाजी करत आहे.
How good is this kids impersonation of @Jaspritbumrah93 in Auckland. @BCCI @BLACKCAPS #woweee pic.twitter.com/0XDtSEqWaW
— Ollie Pringle (@_Ollie_Pringle) February 7, 2020
याबरोबरच न्यूझीलंडचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू स्कॉट स्टायरिसने (Scott Styris) देखील हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी त्याने या व्हिडिओमध्ये टाळ्यांच्या इमोजीचा वापर केला आहे.
👏👏👏👏👏 https://t.co/jFrcfzao3x
— Scott Styris (@scottbstyris) February 8, 2020
दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा माजी खेळाडू सायमन डौल यांनी हा व्हिडिओ बुमराह आणि भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) दाखवला. त्यानंतर हा व्हिडिओ पाहुन बुमराह हसू लागला. तर, चहलने यावर गमतीने म्हटले की, “हा बुमराहपेक्षाही चांगला आहे.”
दुसऱ्या वनडे सामन्यात बुमराहने 10 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 64 धावा दिल्या. परंतु, त्याला एकही विकेट घेता आली नाही.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसरा वनडे सामना मंगळवारी (11 फेब्रुवारी) बे ओव्हल (Bay Oval), माऊंट माउंगनुई (Mount Maunganui) येथे होणार आहे.
२०१९ विश्वचषकानंतरचा टीम इंडियाचा विजयी रथ न्यूझीलंडने रोखला
वाचा👉https://t.co/zpCgyrG7Ok👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020
विराट कोहलीच्या १२ वर्षांच्या वनडे कारकिर्दीत पहिल्यांदाच घडली ही नकोशी गोष्ट
वाचा👉https://t.co/fTdER82YMO👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 8, 2020