---Advertisement---

भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला टेंशन, ‘हा’ प्रमुख खेळाडू झाला जखमी

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 11:42 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर १२ फेरीतील सामना रविवारी (३१ ऑक्टोबर) रंगणार आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंडसाठी एक वाईट बातमी आहे. न्यूझीलंड संघाचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टिल हा अंगठ्याच्या दुखापतीने त्रस्त असून भारताविरुद्धच्या सामन्यात तो खेळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गप्टिलला दुखापत झाली होती. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरीश रौफचा चेंडू थेट त्याच्या अंगठ्यावर आदळला आणि त्याच्या अंगठ्याला जबर दुखापत झाली. आता भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला तंदुरुस्त होणे कठीण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने २० चेंडूत १७ धावा केल्या होत्या.

या टी२० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडच्या खेळाडूला दुखापत होण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी ऍडम मिल्नेचा न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. गप्टिल दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला, तर न्यूझीलंडसाठी हा मोठा धक्का असेल.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यानंतर गप्टिलची तब्येत बरी नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘सामन्यानंतर गप्टिल थोडा अस्वस्थ दिसत होता आणि पुढील २४ ते ४८ तास निर्णायक असतील. रात्रीनंतर त्याला कसे वाटते ते आम्ही पाहू.’

उपांत्य फेरीत जाण्यासाठी न्यूझीलंडला विजय आवश्यक
पाकिस्तानविरुद्धचा पहिला सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडला भारताविरुद्ध विजय मिळवणे अत्यावश्यक झाले आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघाला केवळ १३४ धावा करता आल्या होत्या आणि पाकिस्तानने अवघ्या पाच विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. या विजयासह पाकिस्तान दुसऱ्या गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि भारताच्या अडचणी देखील वाढल्या आहेत.

दुसऱ्या गटात पाकिस्तान हा नवा उत्कृष्ट संघ असल्याचेही गॅरी स्टेड म्हणाले. गॅरी स्टेड म्हणाले की, ‘भारताविरुद्धचा सामना न्यूझीलंडसाठी अधिक महत्त्वाचा झाला आहे. काहीवेळा तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी शोधण्यासाठी सामना गमवावा लागतो. जर आम्ही भारतीय संघाला हरवू शकलो, तर नक्कीच गोष्टी योग्य मार्गावर येतील.’

महत्त्वाच्या बातम्या –

बाबो! सलग ५ चेंडूत गेल्या ५ विकेट्स, ब्राझीलच्या लॉरा कार्डोसोने टाकले ऐतिहासिक षटक

चहलला मागे टाकत झंपा ‘ऑन टॉप’; दोन बळींसह केला मोठा कारनामा

श्रीलंकेचे कांगारूंपुढे लोटांगण; ऑस्ट्रेलियाची मोठ्या विजयासह गुणतालिकेत आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---