---Advertisement---

श्रीलंकेचे कांगारूंपुढे लोटांगण; ऑस्ट्रेलियाची मोठ्या विजयासह गुणतालिकेत आघाडी

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 11:08 PM
---Advertisement---

संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळल्या जात असलेल्या टी२० विश्वचषकात गुरुवारी (२८ ऑक्टोबर) ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले. या अटीतटीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. या विजयासह ऑस्ट्रेलिया संघ अ गटाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहचला‌. केवळ १४ धावा देऊन दोन बळी घेणाऱ्या ऍडम झंपा याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

श्रीलंकेची सन्मानजनक धावसंख्या
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेसाठी कुसल परेरा व चरिथ असलंका यांनी प्रत्येकी ३५ धावांच्या खेळ्या केल्या. भानुका राजपक्षे याने अखेरपर्यंत नाबाद राहत ३३ धावा ठोकल्या. कर्णधार दसुन शनाकाने १९ चेंडूवर १२ धावांची धीमी खेळी केली. ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स व ऍडम झंपा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

ऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय
श्रीलंकेने दिलेल्या १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियासाठी डेव्हिड वॉर्नर व ऍरॉन फिंच यांनी ७ षटकात ७० धावांची वेगवान सलामी दिली. कर्णधार फिंचने ३७ आणि वॉर्नरने ६५ धावांची खेळी केली. स्टीव्ह स्मिथ (नाबाद २८) व मार्कस स्टॉयनिस (नाबाद १६) यांनी अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला सात गडी राखून विजय मिळवून दिला. लेगस्पिनर ऍडम झंपा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

ऑस्ट्रेलियाची गुणतालिकेत आघाडी
या विजयासह ऑस्ट्रेलिया अ गटामध्ये अव्वलस्थानी पोहोचला. त्यांचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यांनी आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. दुसरीकडे श्रीलंकेचा दुसऱ्या सामन्यातील हा पहिला पराभव आहे. त्यांनी पहिल्या सामन्यांमध्ये बांगलादेशला पराभूत केलेले. उपांत्य फेरी गाठायची असेल तर श्रीलंकेला उर्वरित सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागेल.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई करणार हार्दिकला रिलीज? श्रेयस सोडणार दिल्लीची साथ?

आनंदाची बातमी! दिनेश कार्तिक-दीपिका पल्लिकल झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा, चिमुकल्यांची नावंही ठरली

कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---