---Advertisement---

आनंदाची बातमी! दिनेश कार्तिक-दीपिका पल्लिकल झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा, चिमुकल्यांची नावंही ठरली

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 9:04 PM
---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक आणि भारताची स्क्वॉशपटू दीपिका पल्लिकल या दाम्पत्याने गुरुवारी सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. दिनेश आणि दीपिका दोन जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आहे.

दिनेशने त्याचा आणि दीपिकाचा त्यांच्या दोन्ही नवज्यात मुलांसह आणि त्यांच्या पाळीव कुत्र्यासह फोटो पोस्ट केला आहे. या फोटोंना त्याने कॅप्शन दिले आहे की ‘आणि आमचे कुटुंब ३ वरुन ५ सदस्यांचे झाले. दीपिका आणि मी दोन सुंदर मुलांचे आई-बाबा झालो आहोत. कबीर पल्लिकल कार्तिक आणि झियान पल्लिकल कार्तिक. आम्हाला खूप आनंद झाला आहे.’

दिनेश आणि दीपिका यांनी काहीदिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करत ते आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. आता त्यांना दोन जुळी मुलं झाली असून त्यांची नावंही त्यांनी सर्वांना सांगितली आहेत. कबीर आणि झियान अशी दोन्ही मुलांची नावं ठेवण्यात आली आहेत.

दिनेश आणि दीपिका यांनी २०१३ मध्ये लग्नगाठ बांधली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या खेळाकडेही दुर्लक्ष होऊ दिले नव्हते. कार्तिक २०१९ पासून भारतीय संघातून बाहेर आहे. पण असे असले तरी तो नुकतेच आयपीएल २०२१ हंगामात खेळताना दिसला होता. तसेच, काही दिवसांपूर्वी त्याने समालोचन क्षेत्रातही पाऊल टाकले होते.

सध्या त्याला त्याच्या दोन्ही नवजात मुलांसह वेळ घालवता येणार आहे. त्याने ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सईद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेतून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे आता या स्पर्धेत तमिळनाडूचे नेतृत्व विजय शंकर करणार आहे.

कार्तिकने आजपर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २६ कसोटी, ९४ वनडे आणि ३२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत.

दीपिकाबद्दल सांगायचे झाले तर, ती भारताची अव्वल स्क्वॉशपटूंपैकी एक असून तिने भारताला मोठे यश मिळवून दिले आहे. तिने २०१४ साली राष्ट्रकुल स्पर्धेत दुहेरीत सुवर्णपदकाची कमाई केली होती. तसेच २०१८ साली तिने २ रौप्यपदकं जिंकली होती. एशियन गेम्समध्येही तिने भारताला १ रौप्य आणि ३ कांस्यपदक जिंकून दिले आहेत. तिला भारत सरकारकडून अर्जून पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

कहर! नामिबियाच्या गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात घेतल्या ३ विकेट्स, आयसीसीकडूनही कौतुक

कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी

‘तुम्ही कोणत्या देशाचे याने फरत पडत नाही’, वकार युनूसला माजी पाकिस्तानी खेळाडूचाच घरचा आहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---