इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम संपल्यानंतर लगेचच पंधराव्या हंगामाचे बिगुल वाजले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वीच आयपीएलमध्ये आणखी दोन संघांचा समावेश केला आहे. लखनौ आणि अहमदाबाद हे दोन संघ पुढील वर्षी आयपीएलमध्ये खेळताना दिसतील. तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सच्या व दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातून महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या आहेत.
या खेळाडूंना केले जाऊ शकते रिटेन
माध्यमांतील वृत्तानुसार, बीसीसीआय आयपीएलच्या मूळ आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ शकते. यामध्ये दोन भारतीय व दोन विदेशी अथवा तीन भारतीय व एक विदेशी असे खेळाडू रिटेन केले जाऊ शकतात. असे झाल्यास पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कायरन पोलार्ड या तिघांना कायम करण्याची दाट शक्यता आहे. चौथा खेळाडू म्हणून युवा यष्टीरक्षक ईशान किशन अथवा सूर्यकुमार यादव यांच्या नावाचा विचार होईल.
हार्दिकला केले जाणार रिलीज
मुंबई इंडियन्ससाठी सहा हंगाम खेळलेला भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याला मुंबई संघ व्यवस्थापन रिलीज करू शकते. कारण, तो सध्या केवळ एक फलंदाज म्हणून संघाचा भाग आहे. त्याचे गोलंदाजीतील योगदान संख्या नगण्य असून संघ व्यवस्थापन त्याऐवजी एक पूर्णवेळ फलंदाज खेळवू शकते. असे झाल्यास हार्दिकला मेगा लिलावात उतरावे लागेल.
श्रेयस सोडणार दिल्लीची साथ
दिल्ली कॅपिटल्सचे दोन हंगामात नेतृत्व केलेला श्रेयस अय्यर हा देखील दिल्लीची साथ सोडू शकतो. त्याला कोणत्याही एका संघाचे नेतृत्व करण्याची इच्छा आहे. मात्र, रिषभ पंत आज यापुढे देखील दिल्लीचा कर्णधार राहणार असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे श्रेयस नव्या फ्रॅंचाईजीचा कर्णधार होऊ शकतो अथवा लिलावात सहभागी होऊन इतर संघांकडे जाऊ शकतो. पुढील हंगामात खेळणाऱ्या लखनौ व अहमदाबाद या संघांना मेगा लिलावापूर्वी तीन खेळाडू निवडण्याची परवानगी देण्यात येऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी
आनंदाची बातमी! दिनेश कार्तिक-दीपिका पल्लिकल झाले जुळ्या मुलांचे आई-बाबा, चिमुकल्यांची नावंही ठरली






