IPL 2025, New Zealand Cricket Team : न्यूझीलंड क्रिकेट संघ एप्रिल 2025 पर्यंत खूप व्यस्त असणार आहे. त्यांनी त्यांच्या मायदेशात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. पण या वेळापत्रकामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) बाबत बीसीसीआयचा तणाव वाढला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने 2024-25 च्या घरच्या हंगामाची अधिकृत घोषणा केली आहे. याअंतर्गत न्यूझीलंडला पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकांमुळे न्यूझीलंडचे स्टार क्रिकेटपटू आयपीएल 2025 मध्ये खेळू शकणार नाहीत. त्यामुळे आयपीएल फ्रँचायझींची डोकेदुखी वाढू शकते.
हे स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडू शकतात
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील मालिका आयपीएलच्या कालावधीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे न्यूझीलंडचे स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडू शकतात. या स्टार खेळाडूंमध्ये डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, केन विलियम्सन, मिचेल सँटनर, रचिन रवींद्र आणि डॅरेल मिशेल यांचा समावेश आहे. मात्र, यावर उपाय शोधला जाऊ शकतो.
न्यूझीलंड बोर्ड पाकिस्तानविरुद्धच्या या मालिकांसाठी आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंचा समावेश न करण्याची अपेक्षा आहे. याचे उदाहरण म्हणजे आयपीएल 2024 चा हंगाम. या मोसमातही न्यूझीलंडला पाकिस्तान दौऱ्यावर जायचे होते, त्यानंतर न्यूझीलंडने बी टीम पाकिस्तानात पाठवली होती.
न्यूझीलंड संघाचे वेळापत्रक
वेळापत्रकानुसार, न्यूझीलंड क्रिकेट संघ 2024-25 च्या घरच्या हंगामात इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या वेळापत्रकात संघाला 3 कसोटी, 6 वनडे आणि 8 टी20 सामने खेळायचे आहेत. तर महिला संघाला 6 वनडे आणि 6 टी20 सामने खेळायचे आहेत.
The summer schedule is here!
Read more | https://t.co/BgMTnuvGJO #CricketNation pic.twitter.com/n9GXk9wK80
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 16, 2024
न्यूझीलंडचे 2024-25 चे घरच्या हंगामाचे वेळापत्रक
इंग्लड विरुद्धची मालिका
28 नोव्हेंबर-2 डिसेंबर, पहिली कसोटी, क्राइस्टचर्च
6 डिसेंबर-10 डिसेंबर, दुसरी कसोटी, वेलिंग्टन
14 डिसेंबर-18 डिसेंबर, तिसरी कसोटी, हॅमिल्टन
श्रीलंकेविरुद्धची मालिका
28 डिसेंबर, पहिली टी20, तौरंगा
30 डिसेंबर, दुसरी टी20, तौरंगा
2 जानेवारी, तिसरी टी20, नेल्सन
5 जानेवारी, पहिला वनडे, वेलिंग्टन (बेसिन रिझर्व्ह)
8 जानेवारी, दुसरा वनडे, हॅमिल्टन
11 जानेवारी, तिसरा वनडे, ऑकलंड
पाकिस्तान विरुद्धची मालिका
16 मार्च, पहिली टी20, क्राइस्टचर्च
18 मार्च, दुसरी टी20, ड्युनेडिन
21 मार्च, तिसरी टी20, ऑकलंड
23 मार्च, चौथी टी20, तौरंगा
26 मार्च, पाचवी टी20, वेलिंग्टन (स्काय स्टेडियम)
29 मार्च, पहिली वनडे, नेपियर
2 एप्रिल, दुसरी वनडे, हॅमिल्टन
5 एप्रिल, तिसरी वनडे, तौरंगा
महत्वाच्या बातम्या-
एका फलंदाजामुळे दुसरा फलंदाज झेलबाद…! मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
“मी इथे हरवलो आहे” शिखर धवनची इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल
“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले?