आयसीसी वनडे विश्वचषक 2023च्या 32व्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने मोठी धावसंख्या उभी केली. पण प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. न्यूझीलंडचा सपूर्ण संघ अवघ्या 167 धावांवर सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकने हा सामना 190 धावांनी जिंकली. या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारताला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पुण्याच्या माहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ही रंगतदार लढत पार पडली.
न्यूझीलंडला जिंकण्याासठी 358 धावांचे मोठे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेकडून मिळाले होते. मात्र, त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक किंवा समाधानकारक खेळी करू शकला नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघासाठी केशव महाराज याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर मार्को यान्सेन याने 2 विकेट्स घेतल्या. क्विंटन डी कॉक आणि रासी वॅन डर ड्युसेन यानी दक्षिण आफ्रिकेसाठी केलेल्या धावा वियासाठी महत्वाच्या ठरल्या. न्यूझीलंडसाठी ग्लेन फिलिप्स याने एकाकी झुंज दिली. पण 60 धावांची खेळी केल्यानंतर त्यानेही विकेट गमावली आणि न्यूझीलंडला पराभव स्वीकारावा लागला
उभय संघांतील या सामन्याची नाणेफेक न्यूझीलंडने जिंकली होती आणि दक्षिण आफ्रिका संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका संघाने 50 षटकांमध्ये 4 विकेट्सच्या नुकसानावर 357 धावांपर्यंत मजल मारू शकला. यात सलामीवीर क्विंटन डी कॉक आणि रासी वॅन डर ड्युसेन यांनी वैयक्तिक शतके ठोकली. डी कॉक याने 114, तर ड्युसेनने 133 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याचसोबत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या डेव्हिड मिलर यानेही शेवटच्या षटकांमध्ये ताबडतोड खेळी करत 53 धावा कुटल्या आणि संघाची धावसंख्या उंचावली.
प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघाची धावसंख्या 100 असताना त्यांच्या सुरुवातीच्या सहा विकेट्स पडल्या होत्या. पुढच्या चार खेळाडूंनी संघासाठी 67 धावा केल्या आणि आपल्या विकेट्स गमावल्या. रासी वॅन डर ड्युसेनला सामनावीर पुरस्कार दिला गेला. (New Zealand suffered a heavy defeat against South Africa)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट.
दक्षिण आफ्रिका – क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रासी व्हॅन डर ड्युसेन, एडेन मार्करम, हेन्रीच क्लासेन, डेविड मिलर, मार्को यान्सेन, जेराल्ड कोएट्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी.
महत्वाच्या बातम्या –
डी कॉकनंतर ड्यूसेनने दाखवला दर्जा! ‘इतक्या’ चेंडूत ठोकली विश्वचषक हंगामातील दुसरं शतक
तूच रे वाघा! डी कॉकने झळकावलं वर्ल्डकप 2023चं चौथं शतक, षटकार मारून घडवला इतिहास