भारतीय संघाचा यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुढील दौरा न्यूझीलंड देशाचा आहे. या दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीची टीम इंडिया 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात नेपीयर वनडेने 23 जानेवारी रोजी होणार आहे. तर वेलिंग्टनला 5वा वनडे सामना 3 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे.
या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची यापुर्वीच घोषणा झाली असून या वनडे मालिकेत युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
या न्यूझीलंड दौऱ्यातून अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच सलामीवीर केएल राहुलला वगळले आहे. ऑस्ट्रेलियापाठोपाठ याही वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
याबरोबरच पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी 14 जणांच्या न्यूझीलंड संघाचीही घोषणा झाली आहे. या वनडे संघात अष्टपैलू मिशेल सॅन्टेनरचे पुनरागमन झाले आहे. तो 2018 मध्ये गुडघा दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर होता.
त्याचबरोबर टॉम लॅथम आणि कॉलीन डी ग्रँडहोम यांचाही न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांना श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती.
वनडे मालिका-
पहिला वनडे सामना- नेपीयर- 23 जानेवारी, सकाळी 7.30 वाजता
दुसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- 26 जानेवारी, सकाळी 7.30 वाजता
तिसरा वनडे सामना- माऊंट मॉनगनुई- 28 जानेवारी, सकाळी 7.30 वाजता
चौथा वनडे सामना- हॅमिल्टन- 31 जानेवारी, सकाळी 7.30 वाजता
पाचवा वनडे सामना- वेलिग्टंन- 03 फेब्रुवारी, सकाळी 7.30 वाजता
न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), शुभमन गिल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, मोहम्मद शमी.
पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी असा आहे न्यूझीलंड संघ –
केन विलियमसन(कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डो ब्रासवेल, कॉलीन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, कॉलिन मुनरो, हेन्री निकोलास, मिशेल सॅन्टेनर, इश सोधी, टिम साऊथी, रॉस टेलर.
महत्त्वाच्या बातम्या-
–कर्णधार कोहलीने केले एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक, चाहतेही ऐकुन होतील खुश
–जयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…