भारतीय संघाचा यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुढील दौरा न्यूझीलंड देशाचा आहे. या दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीची टीम इंडिया ५ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे.
या दौऱ्याची सुरुवात नेपीयर वनडेने २३ जानेवारी रोजी होणार आहे. तर टी२० मालिकेला ६ फेब्रुवारी रोजी वेलिंग्टनला होणाऱ्या सामन्याने सुरुवात होणार आहे. तर या दौऱ्याचा शेवटचा सामना हॅमिल्टनला १० फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० सामन्याने होणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाची यापुर्वीच घोषणा झाली असून या दौऱ्यात युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची शक्यता आहे.
या न्यूझीलंड दौऱ्यातून अष्टपैलू हार्दिक पंड्या तसेच सलामीवीर केएल राहुलला वगळले आहे. तसेच या दौऱ्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी टी२० संघात सिद्धार्थ कौलचा समावेश करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या टी२० मालिकेसाठी भारताच्या संघात यष्टीरक्षक रिषभ पंतचाही समावेश करण्यात आला आहे. पंतला ऑस्ट्रेलिया पाठोपाठ न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण त्याला टी२० संघात संधी देण्यात आली आहे.
त्यामुळे या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात दिनेश कार्तिक, एमएस धोनी आणि रिषभ पंत असे तीन यष्टीरक्षणासाठी पर्याय असतील.
अशी आहे न्यूझीलंड विरुद्ध भारत टी२० मालिका-
पहिला टी२० सामना- वेलिग्टंन- ०६ फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
दुसरा टी२० सामना- ऑकलंड- ०८ फेब्रुवारी, सकाळी ११.३० वाजता
तिसरा टी२० सामना- हॅमिल्टन- १० फेब्रुवारी, दुपारी १२.३० वाजता
न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), विजय शंकर, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, शुभमन गिल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
–हा खेळाडू करतो एमएस धोनीला रोज फोन…
–एमएस धोनीसाठी फलंदाजीतील हा क्रमांक योग्य, कर्णधार कोहलीने केला खूलासा