ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022चा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना बुधवारी (9 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (एससीजी) खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे.
न्यूझीलंडने साखळी फेरीतील 5 पैकी 3 सामने जिंकत त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान कायम राखले आणि उपांत्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ होण्याचा मान प्राप्त केला. दुसरीकडे पाकिस्तानला नशिबाची साथ लाभली. नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिंवत राहिल्या. तसेच त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले.
दोन्ही संघाचा आयसीसी स्पर्धांमधील इतिहास आणि सिडनीमधील कामगिरी
दोन्ही संघ या मैदानावर अपराजित राहिले आहेत. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आहे. तसेच न्यूझीलंडने आयसीसी विश्वचषक स्पर्धांच्या उपांत्य फेरीचे तीन सामने जिंकले तर आठ सामने गमावले आहेत. दुसरीकडे पाकिस्तानने 10 सामने जिंकले तर तेवढेच सामने गमावले आहेत.
हेट-टू-हेड
न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 28 टी20 सामने खेळले गेले. त्यातील 17 सामने जिंकत पाकिस्तान आघाडीवर आहे. त्यातील 6 पैकी 4 सामने त्यांनी टी20 विश्वचषकातच जिंकले आहेत.
सामन्याच्या दिवसाचे वेदर आणि पीच रिपोर्ट-
या विश्वचषकात आतापर्यंत एससीजीमध्ये खेळल्या गेलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी विजय मिळवला आहे. पण नाणेफेकीचा प्रभाव कमी करू शकणारा एक घटक आहे: उपांत्य फेरीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीच आहे ज्यावर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर 12चा पहिला सामना खेळला गेला. सिडनीमध्ये आतापर्यंत वापरल्या गेलेल्या तीन खेळपट्ट्यांपैकी ही सर्वात सपाट आणि फलंदाजीसाठी अनुकूल आहे.
बुधवारी सकाळी पावसाची शक्यता कमी आहे, परंतु सामना सुरू होण्याच्या वेळेपर्यंत हवामान साफ होण्याची शक्यता आहे.
कुठे पाहणार पाकिस्तान-न्यूझीलंड उपांत्य सामना-
टी20 विश्वचषक भारतामध्ये डिज्नी हॉटस्टार आणि स्टार नेटवर्कवर प्रसारित होत आहे. तसेच दूरदर्शनवरही उपांत्य फेरीचे सामने दाखवले जाणार आहेत.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
न्यूझीलंडची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
फिन ऍलन, डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
पाकिस्तानची संभाव्य प्लेईंग इलेव्हन-
मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुखापती इंग्लंडचा पिच्छा सोडेना! मलानपाठोपाठ ‘हा’ वेगवान गोलंदाजही झाला जखमी, भारताचे टेन्शन मिटले
मोठी घोषणा! दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये टी20 लीगची सुरुवात, आयपीएलच्या 6 फ्रँचायझींनी उतरवले आपले संघ