ख्रिस्टचर्च। न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा पहिला डाव 104 धावांवर संपूष्टात आला आहे. न्यूझीलंडकडून या डावात ट्रेंट बोल्टने 30 धावांत 6 विकेट्स घेतल्या आहेत.
बोल्टने या 6 विकेट्स फक्त 15 चेंडूमध्ये घेतल्या आहेत. त्यातील 5 विकेट्स त्याने 11 चेंडूत घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 5 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. याआधी हा विक्रम मॉन्टी नोबेल, जॅक कॅलिस आणि केमार रोच यांच्या नावावर संयुक्तरित्या होता.
नोबेल यांनी 1902 मध्ये इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच कॅलिसमे 2002 मध्ये बांगलादेशविरुद्ध तर केमार रोचने याच वर्षी बांगलादेश विरुद्धच 12 चेंडूत 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.
श्रीलंका संघ या सामन्यात 36.4 षटकात 5 बाद 94 धावा अशा स्थितीत होती. मात्र त्यानंतर बोल्टच्या गोलंदाजीचा सामना श्रीलंकेच्या मधल्या आणि तळातल्या फलंदाजांना करताच आला नाही. श्रीलंकेने पुढच्या 10 धावांत सर्व विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या शेवटच्या 6 विकेट बोल्टने घेतल्या. या 6 विकेट त्याने फक्त 15 चेंडूत 4 धावा देत घेतल्या.
15 balls, 6 wickets..
Unbelievable spell @trent_boult #NZvSLpic.twitter.com/MSaEzuTzL7— Misal (@MisalRaj_) December 27, 2018
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत 5 विकेट्स घेणारे गोलंदाज –
11 चेंडू – ट्रेंट बोल्ट (श्रीलंका विरुद्ध, ख्रिस्टचर्च, 2018)
12 चेंडू – मॉन्टी नोबेल (ऑस्ट्रेलिया विरुद्ध, मेलबर्न, 1902)
12 चेंडू – जॅक कॅलिस (बांगलादेश विरुद्ध, पोचफेस्टरूम, 2002)
12 चेंडू – केमार रोच ((बांगलादेश विरुद्ध, नॉर्थ साउंड, 2018)
महत्त्वाच्या बातम्या:
–शतक तर पुजाराने केले परंतु ही गोष्ट करुन कायम नाव इतिहासात कोरले
–फक्त सचिनचेच नाही तर द्रविडचेही विक्रम मोडतोय विराट
–ऑस्ट्रेलियन समालोचकांकडून आजचा हिरो ‘मयांक अगरवाल’चा मोठा अपमान