विश्वचषक 2023च्या पहिल्याच सराव सामन्यात केन विलियम्सन याने न्यूझीलंडसाठी मैदानात पुनरागमन केले. पुनरागमनाच्या सामन्यात कर्णधार विलियम्सन याने अर्धशतकी केली जी संघाच्या कामी आली. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात शुक्रवारी (29 सप्टेंबर) न्यूझीलंडने 5 विकेट्सने विजय मिळवला. विलियम्सनसह सलामीवीर रचित रविंद्र आणि यष्टीरक्षक टॉम लॅथम यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला विजयासाठी मदत केली.
Rachin Ravindra 97 and Mark Chapman 65* top scoring in the chase! Williamson (54) and Mitchell (59) both making contributions before being retired in Hyderabad in today’s warm-up against Pakistan. Scorecard | https://t.co/DOWJ07JPRH #CWC23 pic.twitter.com/3o9flcrJ4j
— BLACKCAPS (@BLACKCAPS) September 29, 2023
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार बाबर आझम याने 80, तर यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान याने 103 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी देखील झाली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला सौद शकिल आला आणि त्याने 75 धावा कुटल्या. मध्यक्रमातील या भक्कम फळीमुळे पाकिस्तानने 50 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 345 धावा केल्या.
प्रत्युत्तरात न्यूझीलंडसाठी हे लक्ष्य कठीण दिसत होते. मात्र, सलामीवीर रचित रविंद्र याने संघाला चांगली सुरुवात दिली. सलामीवीर डिवॉन कॉनवे शुन्यावर बाद झाला. पण तिसऱ्या क्रमांकावर आलेला कर्णधार केन विलियम्सन याने 50 चेंडूत 54 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. रचित आणि विलियम्सन यांचीतील भागीदारीमुळे न्यूझीलंडचा चांगली सुरुवात मिळाली. चौथ्या क्रमांकावर आलेल्या डार्ली मिचेल याने 57 चेंडूत 59 धावांची खेळी केली.मार्क चॅपमन याने न्यूझीलंडसाठी फिनिशरची भूमिका चोख पार पाडली. अवघ्या 41 चेंडूत 65 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
गोलंदाजांमध्ये न्यूझीलंडसाठी मिचेल सॅटनर याने 2, तर मॅट हेनरी, जेम्स निशमआणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पाकिस्तानसाठी उसमा मीर याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. मोहम्मद नवास, हसन अली आणि आघा सुलतान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. (New Zealand win against Pakistan by 5 wickets in practice match)
महत्वाच्या बातम्या –
मोहम्मद रिझवानकडून विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्याच सराव सामन्यात शतक ठोकत दाखवून दिला फॉर्म
स्टुअर्ट ब्रॉडच्या सन्मानार्थ मोठा निर्णय, ज्या स्टेडियमवर क्रिकेटशी प्रेम झालं, तिथेच लावली आपल्या नावाची पाटी