कोणताही आंतरराष्ट्रीय सामना असो कसोटी, वनडे किंवा टी20, या प्रत्येक सामन्यात पंचांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. पंचांच्या निर्णयामुळे सामन्याचा निकाल पालटल्याचे आपण अनेकदा पाहिले किंवा ऐकले आहे. मात्र, शुक्रवारी (दि. 30 जून) श्रीलंका महिला विरुद्ध न्यूझीलंड महिला संघात पार पडलेल्या वनडे सामन्यात पंचांनी अशी चूक केली, ज्यामुळे अनोख्या विक्रमाची नोंद झाली. असा विक्रम वनडे क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत होऊ शकला नव्हता.
ईडन कार्सनने सामन्यात 11 षटके टाकली
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना गाले स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात श्रीलंका संघ न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरला होता. यादरम्यान झाले असे की, न्यूझीलंडची गोलंदाज ईडन कार्सन (Eden Carson) हिने वनडेत 11 षटके टाकली. कार्सनने सामन्याचे 45वे षटक टाकताच आपली 10 षटके पूर्ण केली होती. मात्र, पंचांच्या चुकीमुळे न्यूझीलंडच्या या गोलंदाजाने डावाचे 47वे षटकाच्या रूपात आपले 11वे षटक टाकले. वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने 11 षटके टाकण्याची ही पहिलीच वेळ होती.
कार्सनची शानदार गोलंदाजी
ईडन कार्सन हिने शानदार गोलंदाजी करत 11 षटकात फक्त 41 धावा कर्च केल्या. तसेच, श्रीलंकेच्या दोन दिग्गज फलंदाजांना तंबूत धाडले. तिने हर्षिता समरविक्रमा आणि कविशा दिलहारी यांची विकेट घेतली. कार्सनने 11व्या षटकात 5 चेंडू निर्धाव टाकत फक्त 1 धाव खर्च केली होती.
न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत न्यूझीलंडने 1-1 अशी बरोबरी साधली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 111 धावांनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 329 धावा चोपल्या होत्या. यामध्ये कर्णधार सोफी डिवाईन (Sophie Devine) आणि अमेलिया केर (Amelia Kerr) यांनी शतक झळकावले. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 229 धावांची विक्रमी भागीदारी रचली. ही वनडे क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्धची सर्वात मोठी भागीदारी ठरली. अमेलिया केर हिने 108 धावा चोपल्या, तर सोफीने 121 चेंडूत 137 धावांची वादळी खेळी साकारली. 330 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाचा डाव 218 धावांवरच संपुष्टात आला होता. त्यामुळे न्यूझीलंडने 111 धावांनी मोठा विजय मिळवला. (new zealand womens team spin bowler eden carson bowled 11 overs spell in an odi match nz vs sl)
महत्वाच्या बातम्या-
अमेलिया-सोफीच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा दमदार विजय, श्रीलंकेला 111 धावांनी पत्करावी लागली हार
व्हिडिओ: रोहित-रितिकाकडून लेक समायराला मिळाले आयुष्यभर लक्षात राहील असे सरप्राईज, लंडनमध्ये…