आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024च्या फायनल सामन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघ (New Zealand And South Africa) आमने-सामने होते. दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडने 20 षटकांत 158/5 धावा केल्या. यादरम्यान अमेलिया केरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. तिने 38 चेंडूत 43 धावा केल्या. तर आफ्रिकेकडून नॉनकुलुलेको म्लाबाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सुझी बेट्स आणि अमेलिया केर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 37 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी 8व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर संपली जेव्हा सुझी बेट्स 31 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 32 धावा केल्या.
त्यानंतर ब्रुक हॅलिडे आणि अमेलिया केर यांनी चौथ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. ही उत्कृष्ट भागीदारी 18व्या षटकात संपुष्टात आली जेव्हा ब्रुक हॅलिडे 28 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 38 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर शानदार खेळी करणाऱ्या अमेलिया केरने 43 धावा करत पॅव्हेलियनचा रस्ता धरला. त्यानंतर सहाव्या विकेटसाठी मॅडी ग्रीन आणि इसाबेला गेज यांनी 17 धावांची भागीदारी करत संघाला 158 धावांपर्यंत नेले.
प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ मर्यादित 20 षटकात केवळ 126 धावाच करू शकला. न्यूझीलंडने हा सामना 32 जिंकत पहिल्यांदाच टी20 विश्वचषकावर नाव कोरले. आफ्रिकेसाठी कर्णधार लौरा वोल्वर्द्तने सर्वाधिक 27 चेंडूत 33 धावांची खेळी केली. दरम्यान तिने 5 चौकार लगावले. सलामीवीर तंझीम ब्रिट्सने 17 धावांची खेळी केली. आफ्रिकेच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला 15हून अधिक धावा करण्यात यश आलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; राहुल खेळला शेवटचा कसोटी सामना? व्हायरल व्हिडिओमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ
SA vs BAN; पहिल्या कसोटीत खेळणार का शाकिब अल हसन? कर्णधार म्हणाला…
वीरेंद्र सेहवागचे ‘हे’ 5 रेकाॅर्ड मोडीत काढणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य!






