भारत सध्या घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळत आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे आणि तेवढ्याच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. दौऱ्याची सुरूवात वनडे मालिकेने होणार असून पहिला सामना 18 जानेवारीला खेळला जाणार आहे. यातील टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडने त्यांचा 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या दौऱ्यात न्यूझीलंडच्या टी20 संघाचे कर्णधारपद अष्टपैलू मिशेल सॅंटनर याच्याकडे आहे, तर अनेक महत्वाच्या खेळाडूंंना वगळले आहे.
केन विलियम्सन (Kane Williamson) आणि टीम साऊदी पाकिस्तान दौऱ्यानंतर घरी परतणार आहे, यामुळे हे दोघेही भारताच्या दौऱ्यातील टी20 संघाचा भाग नाही. तसेच दोन खेळाडूंना टी20 पदार्पणाची संधी आहे. बेन लिस्टर आणि हेन्री शिपले या दोघांना आंतरराष्ट्रीय टी20मध्ये पदार्पण करण्याची संधी आहे. शिपलेने पाकिस्तान दौऱ्यात वनडे पदार्पण केले होते, तर लिस्टर त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळेल.
सध्या किवी संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून कसोटी मालिकेनंतर ते वनडे सामने खेळण्यात व्यस्त आहेत. वनडेमध्ये टॉम लॅथम याच्याकडे नेतृत्व होते. येत्या काही दिवसांत न्यूझीलंड घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची शक्यता आहे. यामुळेच विलियम्सन, साऊदी यांच्याबरोबर ट्रेंट बोल्ट यालाही आराम दिला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (INDvNZ) पहिला टी20 सामना 27 जानेवारीला रांचीमध्ये, दुसरा सामना 29 जानेवारीला लखनऊमध्ये आणि तिसरा सामना 1 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. त्याचबरोबर वनडे मालिकेतील पहिला सामना 18 जानेवारीला हैद्राबाद, दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूर आणि तिसरा सामना 24 जानेवारीला इंदोरमध्ये खेळला जाणार आहे.
Mitchell Santner will lead a strong 15-member T20I squad that will face India later this month.
Details 👉 https://t.co/MrvIiAJeWz pic.twitter.com/Y9QqTdhg3t
— ICC (@ICC) January 12, 2023
भारत दौऱ्यात टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ:
मिचेल सँटनर (कर्णधार), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेन क्लीव्हर, डेवॉन कॉनवे, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन, बेन लिस्टर, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल रिप्पन, हेन्री शिपले, ईश सोधी, ब्लेअर टिकनर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ईस्ट बंगालला अजूनही प्ले ऑफची आशा; जमशेदपूरविरुद्ध 3 गुण मिळवण्याचा निर्धार
INDvsSL | श्रीलंकन संघावर मोठी नामुष्की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नकोसा विक्रम भारताने टाळला