ऑकलंड। उद्या(8 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इडन पार्क येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातून न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची दाट शक्यता आहे.
6 फूट 8 इंच उंची असलेल्या जेमिसनला याआधी डिसेंबर 2019मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंड संघात स्थान दिले होते. मात्र त्याला अंतिम 11 जणांच्या संघात खेळवण्यात आले नाही. तसेच त्याला भारताविरुद्ध सुरु असेलल्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यासाठीही 11 जणांच्या न्यूझीलंड संघात स्थान मिळाले नाही.
पण आता तो उद्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. याबद्दल न्यूझीलंडचे प्रभारी गोलंदाजी प्रशिक्षक शेन जुर्गेनसेन यांनी माहिती दिली.
त्यांनी सांगितले की स्कॉट कुगलेजीनला फ्लूची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे त्याचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी विचार केला जाणार नाही.
तसेच फिरकी गोलंदाज इश सोधीला न्यूझीलंड अ संघाकडून भारत अ संघाविरुद्ध कसोटी सामना खेळण्यासाठी मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे जेमिसनचा उद्याच्या वनडे सामन्यासाठी विचार केला जाऊ शकतो.
जुर्गेनसेन जेमिसनबद्दल म्हणाले, ‘तो नक्कीच मोठा(उंचीने) व्यक्ती आहे. 6 फूट 8 इंच ही नक्कीच प्रभावी उंची आहे. त्यामुळे आम्ही तो काय करु शकतो हे पहाण्यासाठी उत्सुक आहोत. त्याच्याकडे नवीन चेंडू हताळण्याचे चांगले कौशल्य आहे. तो एक चांगला खेळाडू आहे आणि तो थोडीफार फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे त्याच्याकडे खूप प्रतिभा आहे.’
जेमिसनने मागील महिन्यात भारत अ संघाविरुद्ध न्यूझीलंड अ संघाकडून 3 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 6 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने 25 प्रथम श्रेणी सामने खेळताना 72 विकेट्स घेतल्या आहेत. तर अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 27 सामन्यात 35 विकेट्स घेतल्या आहेत.
…आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले
वाचा👉https://t.co/wfy3qf43N2👈#OnThisDay @anilkumble1074 #म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
ज्याचा करिष्मा आयपीएल प्रेमींना पहायचा होता तो खेळाडू आयपीएलमधून बाहेर
वाचा- 👉 https://t.co/zPG0ietgKZ👈#म #मराठी #Cricket #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) February 6, 2020