---Advertisement---

IND vs NZ Final: “25 वर्षांनंतर पुन्हा जिंकायला आवडेल” फायनलपूर्वी स्टार खेळाडूची मोठी प्रतिक्रिया

Will-Young
---Advertisement---

उद्या (9 मार्च) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या फायनल सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड संघ आमने-सामने असणार आहेत. या मेगा स्पर्धेच्या फायनल सामन्यात दोन्ही संघात चुरशीची लढत पाहायला मिळेल. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. भारताने याच मैदानावर साखळी सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली होती. पण फायनलपूर्वी न्यूझीलंडचा सलामीवीर विल यंगने (Will Young) भारतीय संघाच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्यास सक्षम असेल अशी आशा व्यक्त केली आहे. (India vs New Zealand Final Before Will Young Statement)

न्यूझीलंडच्या विल यंगने, डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यासह न्यूझीलंडला स्पर्धेत चांगली सुरुवात करून दिली आहे. यंगने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले होते. यंगने आयसीसीला सांगितले की, ग्रुप स्टेजमधील पराभवातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे, विशेषतः मी एक फलंदाज म्हणून पण गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आणि त्यांच्या खेळण्याच्या पद्धतीलाही पाहिले.

विल यंग म्हणाला की, भारत आणि न्यूझीलंडने अनेक रोमांचक सामने खेळले आहेत आणि सामन्याच्या दिवशी जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल. दोन्ही संघांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 वर्ल्ड कप सेमीफायनलसह खूप चांगले सामने खेळले आहेत, परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर सामन्याच्या दिवशी भूतकाळ महत्त्वाचा नसतो. आम्ही फायनलमध्ये आव्हानांना तोंड देण्याचा प्रयत्न करू आणि दबाव यशस्वीरित्या हाताळण्याची आशा करतो.

25 वर्षांपूर्वी नैरोबीमध्ये भारताला हरवून न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यावर यंग म्हणाला, 25 वर्षांनंतर पुन्हा जिंकणे चांगले होईल, त्यावेळी मी 8 वर्षांचा होतो आणि माझे क्रिकेटवरील प्रेम नुकतेच सुरू झाले होते, मला ती स्पर्धा आठवते आणि ज्या दिवशी ही चॅम्पियन्स ट्रॉफी अनावरण झाली, स्कॉट स्टायरिस तिथे होता आणि त्याने त्या स्पर्धेबद्दल अनेक किस्से सांगितले, आशा आहे की आम्ही ते यश पुन्हा मिळवू शकू.

भारत-न्यूझीलंड संघाच्या वनडे क्रिकेटमधील हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाल्यास, वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ 119 वेळा आमने-सामने आले आहेत. त्यामध्ये भारताचे वर्चस्व राहिले. भारताने 61 सामन्यात मिळवला, तर न्यूझीलंडने 50 सामन्यात विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने 50 सामने गमावले, तर न्यूझीलंडला 61 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही संघातील 7 सामने अनिर्णित राहिले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला. (India vs New Zealand Head to Head Records In ODI)

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ: ‘श्रेयसच्या खेळीमुळे कोहलीच्या खांद्यावरील भार हलका…’ माजी क्रिकेटपटूनं केली अय्यरची स्तुती
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पावसाचा धोका? क्रिकेटप्रेमी जाणून घ्या हवामानाचा अंदाज
रवींद्र जडेजा समोर विराट-रोहितही फेल, अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---