---Advertisement---

न्यूझीलंड कर्णधाराच्या मनात निवृत्तीचा विचार? दिले स्पष्टीकरण

On: सोमवार, ऑगस्ट 1, 2022 3:48 PM
New-Zeland-Womens
---Advertisement---

न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डेव्हाईन हिने निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. डेव्हाईनने सांगितले की सध्या निवृत्त होण्याची त्यांची कोणतीही योजना नाही आणि संघातील तरुणांच्या योगदानाचे कौतुक केले. गेल्या अनेक दिवसांपासून डेव्हाईन निवृत्ती घेणार असल्याची शसक्यता वर्तवली जात होती.

न्यूझीलंडने २०२२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली, ज्यामध्ये डेव्हाईनने 48 धावा केल्या. एजबॅस्टन येथे किवींनी प्रोटीज संघाचा १३ धावांनी पराभव केला. डेव्हाईनने गोलंदाजीतही चांगले योगदान दिले. त्याने चार षटकांत ३७ धावा देत तीन बळी घेतले. दरम्यान, टी-२० फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक विकेट घेणारी सोफी डेव्हाईन ही न्यूझीलंडची पहिली गोलंदाज ठरली.

न्यूझीलंडच्या विजयानंतर सोफी डिव्हाईनला तिच्या भविष्यातील योजनांबद्दल विचारण्यात आले, तेव्हा किवी कर्णधाराने उत्तर दिले, “तू मला निवृत्ती घेण्यास सांगत आहेस का? मी फक्त विनोद करत आहे. मला या वर्षाच्या सुरुवातीला विश्वचषक माझ्या घरी आणायचा होता. या स्पर्धेनंतर स्वत:चे मूल्यमापन केल्यावर माझ्या लक्षात आले की माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक आहे.”

न्यूझीलंड संघ सध्या बदलाच्या काळातून जात आहे. एमी सॅथरवेटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ली तैहूला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संघात स्थान मिळाले नाही. न्यूझीलंडने अनेक तरुणांना संधी दिली आहे आणि या तरुणांना विकसित करण्यात तिची महत्त्वाची भूमिका आहे, असे सोफी डिव्हाईनचे मत आहे.

सोफी डेव्हाईनने तरुणांचे कौतुक केले आणि सांगितले की, “त्यांना लवकरच संघाच्या वातावरणाची सवय झाली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडने इझी गेल, एडन कार्सन आणि फ्रॅन जोनास या तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. मला आवडले की तरुण संघात आले आणि त्यांना वातावरणाची झटपट सवय झाली. मला वाटते याचे श्रेय आमच्या संघाला जाते, ज्यांनी असे वातावरण निर्माण केले आहे की तरुण असो वा वृद्ध, प्रत्येकाला येथे आरामदायी वाटते आणि चांगली कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.”

दरम्यान, नुकतीय वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघातील दिग्गज खेळाडू डिआंड्रा डॉटिन हिने देखील संघातील दुषित वातावरणाला कंटाळून तडकाफडकी निवृत्ती जाहिर केली आहे. असेच सुरू राहिल्यास येत्या काळात अनेक दिग्गज खेळाडू क्रिकेटपासून दूर होऊ शकतात अशी भिती क्रिकेट जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

हरमनप्रीतने चालवली टीम इंडियाची परंपरा, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर केले ‘हे’ हृद्य जिंकणारे कृत्य

दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघात होणार मोठे बदल! माजी दिग्गजाने सांगितली संभाव्य संघ

WI vs IND | दुसऱ्या टी-२० सामन्यावर पावसाचे सावट! वाचा कसे असेल हवामान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---