ब्रिजटाऊन येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा १७ चेंडू आणि ५ गडी राखून पराभव केला. यासह न्यूझीलंड संघाने ३ वनडे मालिका २-१ ने जिंकली. न्यूझीलंडच्या पुरुष संघाने प्रथमच वेस्ट इंडिजमध्ये वनडे मालिका जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या वनडेत न्यूझीलंडचा संघ हरला होता. पण, त्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत शेवटचे दोन वनडे जिंकून मालिका काबीज केली.
न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. विंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने जोरदार फलंदाजी करत ५५ चेंडूत ९१ धावा फटकावल्या. त्याच्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने ८ गडी गमावून ३०१ धावा केल्या. विजयासाठी ३०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, शेवटी नीशमने ११ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या आणि न्यूझीलंड संघाला विजय मिळवून दिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा –
तिसऱ्या वनडे सामन्यात पावसाची शक्यता? जाणून घ्या काय सांगतोय वातावरणचा अहवाल
‘तिसऱ्या वनडेत दीपक चाहर खेळणार?’ बीसीसीआय अधिकाऱ्याने केला खुलासा