---Advertisement---

सॅमसनचा होणार पत्ता कट,एशिया कप 2025साठी अजिंक्य रहाणेनी निवडली प्लेइंग XI

On: शुक्रवार, ऑगस्ट 22, 2025 7:53 AM
---Advertisement---

एशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाल्यानंतर क्रिकेट तज्ज्ञांमध्ये प्लेइंग XI वर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने आपले संभाव्य भारतीय प्लेइंग XI सांगितले आहेत. रहाणेचे म्हणणे आहे की संजू सॅमसनचा संघातून बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे कारण शुभमन गिलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. त्यामुळे गिलचे प्लेइंग XI मध्ये स्थान निश्चित आहे. मात्र, रहाणेच्या वैयक्तिक मतानुसार संजू सॅमसननेच अभिषेक शर्मासोबत सलामीला यावे. सॅमसनने भारतासाठी खेळलेल्या मागील 10 डावांत तीन शतकं ठोकली आहेत.

अजिंक्य रहाणे म्हणाला, “शुभमन संघात परत आला आहे, मला खात्री आहे की तो अभिषेक शर्मासोबत ओपनिंग करेल. वैयक्तिकरित्या, मला संजू सॅमसनला संघात पाहायला आवडेल कारण त्याने खूप चांगली कामगिरी केली आहे. तो आत्मविश्वासू आहे आणि एक उत्तम टीम मॅन आहे. मला वाटतंय हे खूप महत्त्वाचं आहे.”

रहाणे पुढे म्हणाला, “संजू एक बेस्ट टीम मॅन आहे, पण टीम मॅनेजमेंटसाठी ही मोठी समस्या आहे. माझ्या मते कदाचित संजू सॅमसन बाहेर बसेल, जरी मला स्वतःला त्याला XI मध्ये पाहायला आवडेल. पण शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा भारतासाठी सलामीला येतील.”

रहाणेने जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह एकत्र खेळताना पाहण्याची उत्सुकता देखील व्यक्त केली. तो म्हणाला, “मला या एशिया कपमध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंहला एकत्र गोलंदाजी करताना पाहण्याची खूप उत्सुकता आहे. बुमराह किती धोकादायक आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. अर्शदीप सिंह आत्मविश्वासाने भरलेला आहे आणि चेंडू दोन्ही बाजूला स्विंग करू शकतो. त्याचे यॉर्कर, स्ट्रेट असोत की वाईड, खूप प्रभावी आहेत.”

भारतीय संघाची बॅटिंग लाइनअप आणि बॉलिंग युनिट जवळपास निश्चित असून 11वा खेळाडू पिचच्या स्वरूपावर अवलंबून असेल. रहाणेच्या मते, “कारण सामने दुबईत होणार आहेत, त्यामुळे विकेटनुसार निवड केली जाईल – वरुण चक्रवर्ती किंवा हर्षित राणा.”

अजिंक्य रहाणेची एशिया कप 2025 प्लेइंग इलेव्हन – शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती/हर्षित राणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---