मुंबई । आजची भारतीय नेमबाजांची युवा पिढी हुशार आहे. नेमबाजी म्हणजे एकाग्रेतेचा खेळ. त्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची त्यांची तयारी आहे. भारताचा तिरंगा आगामी टोकियो ऑलंपिकसमध्ये हे युवा नेमबाज उंच फडकवतील, असा विश्वास “खेलरत्न” पुरस्कार विजेत्या नेमबाज अंजली भागवत यांनी व्यक्त केला.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या विद्यमाने पत्रकार भवनात आयोजित क्रीडा पत्रकार पुरस्काराच्या निमित्तानं आयोजित “टोकियो ऑलम्पिक २०२० आणि भारतीय नेमबाजी” या विषयावर आयोजित केलेल्या विशेष परिसंवादात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. सोबत “अर्जुन ” पुरस्कार विजेत्या सुमा शिरूर व ऑलंम्पियन नेमबाज दीपाली देशपांडे व्यासपीठावर उपस्थित होत्या. यावेळी महेश विचारे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रमुख पाहुण्या दीपाली देशपांडे म्हणाल्या की नेमबाजी हा एक एकल खेळ आहे. गेल्या सात वर्षात नेमबाजांची नवी पिढी उदयास आली. त्यांना घडवण्यासाठी प्रशिक्षिका म्हणून मी माझे योगदान देताना मला आनंद होतो.
प्रमुख पाहुण्या सुमा शिरूर म्हणाल्या, आजची नेमबाजांची पिढी भाग्यवान आहे. त्यांना आमच्यासारखे ओलम्पियन नेमबाज मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत. आगामी २०२० च्या टोकोयो ऑलम्पिकमध्ये एअर रायफल प्रकारात भारताचे वर्चस्व असायला हवे.
या प्रसंगी मुंबई मराठी पत्रकार संघाने महेश बोभाटे स्मृती जेष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्काराने नवाकाळचे जेष्ठ पत्रकार सुहास जोशी यांचा तर आत्माराम मोरे स्मृती युवा क्रीडा पत्रकार पुरस्काराने महाराष्ट्र टाइम्सचे विनायक राणे यांचा शाल,श्री फळ,स्मृती चिन्ह देऊन गौरव केला. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष होते.
सत्काराला उत्तर देताना सुहास जोशी म्हणाले कि गेल्या साडेतीन दशकांच्या माझ्या क्रीडा पत्रकारितेचा हा गौरव आहे तर विनायक राणे म्हणाले कि माझ्या उमेदवारीच्या काळात माझ्या सहकाऱ्यांनी आणि वर्तमानपत्रांनी मला दिलेले प्रोत्साहन मी कधीच विसरू शकत नाही.
या प्रसंगी संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, कार्यवाह संदीप चव्हाण,विश्वस्त अजय वैद्य. उपाध्यक्ष संजय परब, कार्यकारीणी सदस्य शैलेंद्र शिर्के, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर यांनी आभार प्रदर्शन केले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषकाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले…
–विश्वचषक २०१९: पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी ऑस्ट्रेलियाला बसला मोठा धक्का
–या पाच खेळाडूंपैकी एकाला मिळू शकते शिखर धवन ऐवजी टीम इंडियात संधी