बुधवारी (१८ जुलै) भारतीय क्रिकेट संघाची इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी निवड झाली.
यामध्ये १८ सदस्यीय संघातून वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापतीचे कारण देत वगळण्यात आले आहे.
मात्र १७ जुलैला इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भुवनेश्वर कुमारच अंतिम ११ मध्ये समावेश करण्यात आला होता.
यावरुन भुवनेश्वर जखमी होता तर, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात का खेळला हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दुखापतग्रस्त भुवनेश्वरला तिसऱ्या सामन्यात खेळवल्या बद्दल कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर यामुळे जोरदार टिका होत आहे.
तसेच बीसीसीआयचे अधिकारी या निर्णयाची जबाबदारी संघ व्यवस्थापनावर ढकलून मोकळे झाले आहेत.
या प्रकरणानंतर भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहार्त आणि शंकर बासू यांच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
भुवनेश्वर कुमार आयपीएल स्पर्धेपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. २०१८ च्या आपाएलमध्ये भुवनेश्वर सनरायजर्स हैद्राबादकडून १७ पैकी पाचच सामने खेळला होता.
असे असले तरी भुवनेश्वर कुमारचा इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील समावेशाचा निर्णय राखून ठेवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट आकादमी
-विराट कोहलीने वनडे क्रमवारीत केला हा खास विक्रम