अफगाणिस्तानचा युवा अष्टपैलू अझमतुल्लाह उमरझाईने आयसीसीचा मोठा पुरस्कार जिंकला आहे. यासह, तो आयसीसीचा वार्षिक पुरस्कार मिळवणारा पहिला अफगाणिस्तानी क्रिकेटपटू बनला आहे. परंतु, पहिला आयसीसी पुरस्कार अफगाणिस्तानसाठी अष्टपैलू रशीद खानने जिंकला. अझमतुल्ला उमरझाई हा 2024 चा आयसीसीचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू ठरला आहे. अझमतुल्ला उमरझाईच्या आधी, रशीद खानने अफगाणिस्तानसाठी आयसीसी पुरस्कार जिंकला होता. त्याला 2010-19 साठी आयसीसी ‘टी20 प्लेअर ऑफ द डिकेड’ म्हणून निवडण्यात आले.
2023 मध्ये अझमतुल्लाह उमरझाईने शानदार कामगिरी केली आहे. त्याने 2024 मध्ये जगातील सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडूंपैकी एक होण्याचा मान मिळवला आहे. त्याने त्याच्या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजीने अफगाणिस्तान संघाला एका नवीन उंचीवर नेले. 24 वर्षीय या खेळाडूने गेल्या वर्षभरात टी20 आणि फ्रँचायझी क्रिकेटमध्ये अनेक प्रभावी कामगिरी केली आहे. परंतु तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात प्रभावी ठरला आहे. त्याने वर्षाचा शेवट त्याच्या संघाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून केला आणि 2024 मध्ये तो अफगाणिस्तानमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील होता.
View this post on Instagram
त्याच्या पुढे फलंदाजीत सलामीवीर रहमानउल्लाह गुरबाज तर गोलंदाजीत अल्लाह गझनफर आहेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तानने 5 पैकी 4 एकदिवसीय मालिका जिंकल्या. अफगाणिस्तान संघासाठी ही एक मोठी कामगिरी होती. उमरझाईबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 14 सामन्यांमध्ये एकूण 17 विकेट्स घेतल्या, तर बॅटने 14 सामन्यांमध्ये 417 धावा केल्या. 2024 मध्ये तो टॉप 10 गोलंदाजांमध्ये होता. तर गेल्या वर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो 15 व्या क्रमांकावर होता. परंतु त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला हा पुरस्कार मिळाला. गेल्या दशकभरात टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केल्याबद्दल रशीद खानला 2020 मध्ये आयसीसी दशक पुरस्कार मिळाला होता.
हेही वाचा-
IND VS ENG; तिसऱ्या टी20 सामन्यातूनही मोहम्मद शमी वगळला जाणार? पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
‘310 भारतीय रुपये’, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या तिकिट विक्रीची तारीख जाहीर
विराट कोहली ‘या’ दिग्गजाच्या नेतृत्वात खेळला होता शेवटचा रणजी सामना, यंदा हा खेळाडू कर्णधार