---Advertisement---

प्रो कबड्डी लिलावात कोट्यावधींची उलाढाल, टॉप 5 महागडे स्टार्स कोण?

On: रविवार, जून 1, 2025 12:36 PM
---Advertisement---

Most expensive players PKL 12 auction: प्रो कबड्डी लीगचा 12वा हंगाम उत्साहाने भरलेला असणार आहे. दरवेळी कोट्यवधी रुपयांना विकला जाणारा पवन सेहरावत (Pawan Sehrawat PKL 12 Prize) या वेळी फक्त लाखोंवर समाधान मानावे लागले आहे. यावेळी पवन सेहरावत व्यतिरिक्त अर्जुन देशवाल, नवीन कुमार आणि प्रदीप नरवाल सारखे दिग्गज लिलाव क्षेत्रात उतरले. प्रो कबड्डी लीगच्या (PKL Auction 2025) 12व्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी पाच सर्वात महागडे खेळाडू कोण होते ते जाणून घेऊया.

पीकेएल 12व्या हंगामाच्या लिलावाच्या पहिल्या दिवशी विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू मोहम्मदरेजा शादलू होता. Mohammadreza Shadloui त्याला गुजरात जायंट्सने 2.23 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. गेल्या हंगामात त्याने हरियाणा स्टीलर्ससाठी 139 गुण मिळवून हरियाणाला चॅम्पियन बनवण्यात मोठे योगदान दिले होते. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा खेळाडू देवांक दलाल होता, जो पीकेएल -1चा टॉप रेडर होता. देवांकने गेल्या हंगामात 301 रेड पॉइंट्स मिळवले होते.

दबंग दिल्लीने आशु मलिकवर एफबीएम कार्ड खेळले आहे, ज्याला दिल्लीने 1.90 कोटी रुपयांना राखले आहे. आशु 2021 पासून दबंग दिल्लीकडून खेळत आहे. चौथा सर्वात महागडा खेळाडू अंकित जगलान होता, ज्याच्या जागतिक दर्जाच्या बचावात्मक कौशल्यामुळे तो पीकेएलचा टॉप खेळाडू बनला आहे. अंकितला पटना पायरेट्सने 1.573 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अर्जुन देशवाल 2021 नंतर पहिल्यांदाच जयपूर पिंक पँथर्सपासून वेगळ्या संघाकडून खेळेल. त्याला तमिळ थलैवाजने 1.405 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. PKL Auction Day 1

मोहम्मदरेझा शादलू – 2.23 कोटी (गुजरात जायंट्स)

देवांक दलाल – 2.205 कोटी (बंगाल वॉरियर्स)

आशु मलिक – 1.90 कोटी (दबंग दिल्ली)

अंकित जगलान – 1.573 कोटी (पाटणा पायरेट्स)

अर्जुन देशवाल – 1.405 कोटी (तमिळ थलाईवाज)

भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार पवन सेहरावत गेल्या अनेक हंगामांपासून कोट्यवधींना खेळत आहे. पण यावेळी तमिळ थलाईवाजने त्याला फक्त 59.5 लाख रुपयांना खरेदी केले आहे. यावेळी थलाईवाजने चांगली कमाई केली आहे कारण पीकेएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी रेडर, पवन सेहरावत आणि अर्जुन देशवाल या संघाकडून खेळणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---