---Advertisement---

GT VS PBKS: 9 षटकार खेचत श्रेयस अय्यरनं गुजरातला धो धो धुतलं: VIDEO

---Advertisement---

काल आयपीएलमध्ये (25 मार्च) पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अखेर श्रेयस अय्यरच्या संघाने बाजी मारली. सामन्याच्या आखरेच्या षटकापर्यंत चालेल्या या सामन्यात पंजाब किंग्जने 11 धावांनी सामना जिंकला. 244 अश्या बलाढ्य धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स 232 धावांपर्यंतच पोहचू शकला. पंजाब किंग्जकडून श्रेयस अय्यरने मॅचविनिंग खेळी खेळली.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या श्रेयस अय्यरने केवळ 42 चेंडूत नाबाद 97 धावा केल्या, त्याच्या या खेळीत त्याने 9 षटकार व 5 चाैकर मारले. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत पंजाब किंग्जने मर्यादित 20 षटकात 243 धावा केल्या, श्रेयसच्या या खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला. शिवाय शशांक सिंग 44 तर प्रियांश आर्यनेही 47 धावा केल्या.

आखेर या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने 11 धावांनी विजय मिळवला. गुजरताला 20 षटकात 232 धावाच करता आल्या, ज्यात साई सुदर्शन (74 धावा) जोस बटलर (54 धावा) यांनी अर्धशतकी खेळी खेळल्या, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---