पाणी आयपीएल 2025 च्या 14व्या सामन्यामध्ये, गुजरात टायटन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवून या हंगामात आपला दुसरा विजय नोंदवला. हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर या सामन्यात उतरलेल्या आरसीबी संघाला 18व्या हंगामातील पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने लियाम लिव्हिंगस्टोनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकांत 169 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सने हे लक्ष्य 17.5 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण केले. गुजरातच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, जोस बटलरने नाबाद अर्धशतकी खेळी केली.
Total command! ????????#JosButtler picks the length in a flash and dispatches it into the stands for a towering MAXIMUM! ????
— Star Sports (@StarSportsIndia) April 2, 2025
Watch LIVE action ➡ https://t.co/GDqHMbeZGY#IPLonJiostar ???????? #RCBvGT | LIVE NOW on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar! | #IndianPossibleLeague pic.twitter.com/DNc1oAS8Tm
सामन्यात 170 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात टायटन्सला 32 धावांवर सुरुवातीचा धक्का बसला. शुबमन गिल केवळ 14 धावा करून बाद झाला. येथून साई सुदर्शनला जोस बटलरची साथ मिळाली दोघांनी मिळून पहिल्या 6 षटकांत संघाचा धावसंख्या 42 धावांपर्यंत नेला, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्ये 47 चेंडूत 75 धावांची भागीदारी झाली. साई सुदर्शन 36 चेंडूत 49 धावा करून बाद झाला, तर बटलर शेवटपर्यंत फलंदाजी करत संघाला विजयाकडे नेऊन परतला. या सामन्यात जोस बटलरने 39 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांसह 73 धावांची नाबाद खेळी केली, याशिवाय शेरफेन रदरफोर्डनेही 18 चेंडूत 30 धावांची नाबाद खेळी केली.
On Display: Brute Force ????
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2025
Scorecard ▶ https://t.co/teSEWkWPWL #TATAIPL | #RCBvGT | @gujarat_titans pic.twitter.com/XyHwMy3KVl





