भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी (२९ जुलै) अमेरिकेला १-१ अशा बरोबरीत रोखत विश्चचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश मिळवला.
स्पर्धेच्या नियमानुसार ब गटात अव्वल स्थान पटकावलेल्या आयर्लंडने तीन सामन्यात ६ अंकासोबत थेट उपांत्य पूर्व फेरी गाठली आहे.
तर यजमान इंग्लंड आणि भारताने तीन सामन्यांमध्ये प्रत्येकी दोन गुण मिळवत बाद फेरीत प्रवेश केला आहे.
या सामन्याच्या ११ व्या मिनिटाला पाओलिनो मॅग्वाक्सने गोल करत अमेरिकेला १-० अशी आघाडी मिळवून दिली.
तर सामन्याच्या ३१ व्या मिनिटाला कर्णधार राणी रामपालने गोल करत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
या सामन्यात करो या मरो च्या स्थितीत असलेल्या भारताला १४ आणि १५ व्या मिनिटाला सलग दोन पेनाल्टी कॉर्नर मिळाले. मात्र याचे गोलमध्ये रुपांतर करण्यात भारत अयशस्वी ठरला.
पहिल्या हाफमध्ये अमेरिकेला १८, २८ आणि ३० व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नर मिळाले पण ते सुद्धा गोल करण्यात अयशस्वी ठरले.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–ब्रिटिश जनतेला लवकरच कळेल, कोहली काय चीज आहे!
–काय सांगता! कपिल देव पुन्हा एकदा भारताकडून खेळण्यासाठी सज्ज