आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2024 चा सर्वोत्तम एकदिवसीय संघ जाहीर केला आहे. या संघात कोणत्याही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही. खरं तर हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्काच म्हणावा लागेल. मात्र पाकिस्तान क्रिकेट संघ आणि श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी या टीममध्ये वर्चस्व गाजवले आहे. या दोन्ही देशांतील सात खेळाडू 2024 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाचा भाग बनले आहेत. यानंतर अफगाणिस्तानातील तीन खेळाडूंनाही या संघात स्थान देण्यात आले आहे. तसेच या संघात वेस्ट इंडिजचा एक खेळाडू देखील आहे ज्याला स्थान मिळाले आहे.
आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. या संघात एकूण श्रीलंकेचे चार खेळाडू आहेत. त्यामध्ये कर्णधार म्हणून चरिथ असलंका, यष्टीरक्षक म्हणून कुसल मेंडिस, पथुम निसांका आणि वनिंदू हसरंगा या खेळाडूंचा समावेश आहे. तर पाकिस्तानमधील तीन खेळाडूंनी या संघात स्थान मिळवले आहे. ज्यात सॅम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस राैफ हे तीन खेळाडू आहेत. तर अफगाणिस्तानातील अल्लाह गझनफर, रहमानउल्लाह गुरबाज, अझमतुल्लाह उमरझाई या तीन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
या संघात टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला आयसीसीच्या वर्षातील एकदिवसीय संघात संधी मिळालेली नाही. कारण भारतीय संघाने 2024 मध्ये फक्त तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यात भारतीय संघाला एकही एकदिवसीय सामना जिंकता आला नाही. याशिवाय, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेतील बहुतेक खेळाडू देखील या यादीत आहेत. कारण त्यांनी 2024 मध्ये बरेच एकदिवसीय सामने खेळले आहेत. श्रीलंकेच्या चरिथ असलंकाला या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे.
ICC MEN’S ODI TEAM OF THE YEAR. pic.twitter.com/0ZhkvMDDqT
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 24, 2025
आयसीसीचा 2024 चा सर्वोत्तम एकदिवसीय संघ: सॅम अयुब, रहमानउल्लाह गुरबाज, पथुम निस्सांका, कुसल मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), शेरफेन रुदरफोर्ड, अझमतुल्लाह उमरझाई, वनिंदू हसरंगा, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अल्लाह गझनफर
हेही वाचा-
इतक्या वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार टी20 आंतरराष्ट्रीय सामना, पाहा टीम इंडियाचा विक्रम कसा?
दुसऱ्या डावातही भारतीय सलामीवीर फ्लाॅप, रणजीमध्येही रोहितच्या पदरी निराशाच.!
18व्या आयपीएल हंगामासाठी जाणून घ्या सर्व संघांचे संभाव्य यष्टीरक्षक!