आयसीसीने अलीकडेच 2024 च्या विविध श्रेणींमध्ये पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर केली होती. आता विजेत्यांची घोषणा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, सर्वप्रथम वर्षातील सर्वोत्तम संघाची घोषणा केली जात आहे. पुरुषांच्या एकदिवसीय संघानंतर, आयसीसीने गेल्या वर्षीचा सर्वोत्तम महिला संघही जाहीर केला आहे. पुरुष संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नव्हता पण महिला संघात असे झालेले नाही. यामध्ये दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी एक स्टार सलामीवीर स्मृती मंधानाचे नाव आहे.
या संघात सर्वाधिक खेळाडू इंग्लंडचे आहेत. ज्यात यष्टिरक्षक-फलंदाज एमी जोन्स, केट क्रॉस आणि सोफी एक्लेस्टोन यांचा समावेश आहे. भारताव्यतिरिक्त, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे प्रत्येकी दोन खेळाडू संघात समाविष्ट करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाकडून अॅशले गार्डनर आणि अॅनाबेल सदरलँड यांचा समावेश आहे. दुसरीकडे, आफ्रिकेच्या संघातून, कर्णधार लॉरा वोल्वार्ड व्यतिरिक्त, मॅरिझॅन कॅपला स्थान देण्यात आले आहे.
उर्वरित संघात श्रीलंका आणि वेस्ट इंडिजमधील प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेकडून चामारी अटापट्टू आणि वेस्ट इंडिजकडून हेली मॅथ्यूज यांना स्थान मिळाले आहे. अशाप्रकारे, आयसीसीने वर्षातील महिला एकदिवसीय संघ तयार केला.
Honouring talent, skill, and consistency as part of the ICC Women’s ODI Team of the Year 2024 ✨ pic.twitter.com/gkGd0XqEi1
— ICC (@ICC) January 24, 2025
आयसीसी महिला एकदिवसीय संघ 2024
स्मृती मंधाना (भारत), लॉरा वोल्वार्ड्ट (कर्णधार, दक्षिण आफ्रिका), चामारी अटापट्टू (श्रीलंका), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), मॅरिझाने कॅप (दक्षिण आफ्रिका), अॅशले गार्डनर (ऑस्ट्रेलिया), अॅनाबेल सदरलँड (ऑस्ट्रेलिया), एमी जोन्स (विकेटकीपर, इंग्लंड), दीप्ती शर्मा (भारत), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), केट क्रॉस (इंग्लंड)
SMRITI MANDHANA & DEEPTI SHARMA ARE THE ONLY INDIANS IN ICC ODI TEAM OF THE YEAR 2024 🇮🇳 pic.twitter.com/yYdZIzhCAy
— Johns. (@CricCrazyJohns) January 24, 2025
हेही वाचा-
रणजी सामन्यात गोंधळ, खराब अंपायरिंगमुळे अजिंक्य रहाणे भडकला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आयसीसीचा वनडे संघ जाहीर, एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही
इतक्या वर्षांनंतर चेन्नईमध्ये रंगणार टी20 आंतरराष्ट्रीय सामना, पाहा टीम इंडियाचा विक्रम कसा?