सध्या आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा मुद्दा चांगलाच चिघळला आहे. यंदाची ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पण त्यापूर्वी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान दौरा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अशा परिस्थितीत आयसीसीने पाकिस्तानकडे हायब्रीड मॉडेलमध्ये यजमानपदाची मागणी केली आहे. मात्र, या मुद्द्यावर पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पीसीबीने रविवारी आयसीसीला ईमेल केल्याची पुष्टी केली होती. ज्यामध्ये भारताने त्यांच्या देशाला भेट देण्यास नकार दिल्याचे म्हटले आहे.
पीटीआयच्या वृत्तानुसार, बातमी समोर आली आहे की जोपर्यंत पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदावरून माघार घेण्याचा निर्णय घेतला नाही. तोपर्यंत भारताचे सामने यूएईमध्ये आणि फायनल दुबईमध्ये आयोजित करण्याची सध्याची योजना आहे. खरेतर, बीसीसीआयने आयसीसीला सांगितले आहे की हायब्रीड मॉडेल त्यांना दुबईमध्येच मान्य आहे. पाकिस्तानमध्ये नाही. आयसीसीने पाकिस्तानला याबाबत माहिती दिली आहे. मात्र त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवाय, आयसीसीने पीसीबीला आश्वासन दिले आहे की हायब्रिड मॉडेल अंतर्गत त्यांना संपूर्ण होस्टिंग फी आणि जास्तीत जास्त सामने मिळतील.
चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत आयसीसीचा प्रस्ताव पाकिस्तानने स्वीकारला नाही. पीसीबीने स्पर्धेचे यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतल्यास, आयसीसी संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत हलवण्याचा विचार करू शकते. यापूर्वी, पीसीबीच्या एका सूत्राने सांगितले होते की हायब्रिड मॉडेलवर त्यांची अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.तसेच ते आयसीसीकडून याबाबत अधिक स्पष्टता मागतील. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी अनेक मोठ्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. 2027 चा एकदिवसीय विश्वचषकही दक्षिण आफ्रिकेत खेळवला जाणार आहे. याशिवाय ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळली गेल्यास आशियाई चाहत्यांसाठी चांगली गोष्ट असेल. वास्तविक, आशियाच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यांची वेळ खूपच चांगली आहे.
हेही वाचा-
BGT 2024-25; शार्दुल ठाकुरच्या जागी नितीश रेड्डीला संधी का? गौतम गंभीरने स्पष्टच सांगितले
मुंबईनं केलं रिटेन, पण हार्दिक नाही खेळणार आयपीएलचा पहिला सामना, कारण काय?
IPL 2025; “मला अशा संघात खेळायचे आहे…” आयपीएलपूर्वी केएल राहुलने व्यक्त केली इच्छा