भारतीय क्रिकेट संघ 2025 टी20 वेळापत्रक: 2024 भारतीय क्रिकेट संघासाठी टी20 च्या दृष्टीने अतिशय संस्मरणीय ठरले आणि 17 वर्षांनंतर संघाने आयसीसी टी20 विश्वचषक जिंकला. भारतीय संघाने 2024 मध्ये 26 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ज्यात त्यांनी चमकदार कामगिरी करत 24 सामने जिंकले.
आता 2025 मध्ये देखील भारतीय संघ आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवू इच्छितो आणि 2026 मध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकापूर्वी आपली तयारी मजबूत करू इच्छितो. 2025 च्या भारतीय क्रिकेट संघाच्या टी20 आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावर एक नजर टाकूया:
इंग्लंडचा भारत दौरा: जानेवारी-फेब्रुवारी 2025
इंग्लंड संघ जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये तीन एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ 15 दिवसांचा ब्रेक घेणार असून त्यानंतर 22 जानेवारीपासून त्यांना इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे.
टी20 मालिकेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे
पहिला सामना: 22 जानेवारी, कोलकाता
दुसरा सामना: 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना: 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना: 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना: 2 फेब्रुवारी, मुंबई
भारताचा बांग्लादेश दौरा: ऑगस्ट 2025
ऑगस्ट 2025 मध्ये, भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी20 मालिका खेळण्यासाठी बांग्लादेशचा दौरा करेल.या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.
आशिया कप: ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025
टी20 विश्वचषक फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये आयोजित केला जाणार आहे आणि त्यापूर्वी आशिया चषक देखील भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये आयोजित केला जाईल. भारतीय संघाला पाकिस्तान आणि यूएईसह अ गटात ठेवण्यात आले आहे. ग्रुप स्टेजनंतर चार संघ सुपर 4 मध्ये जातील आणि अव्वल 2 संघ अंतिम फेरीत आमनेसामने येतील. आशिया कप 2025 चे संपूर्ण वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा: नोव्हेंबर 2025
दक्षिण आफ्रिकेचा संघ नोव्हेंबर 2025 मध्ये 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. प्रथम कसोटी मालिका आयोजित केली जाईल आणि त्यानंतर वनडे आणि टी-20 मालिका खेळवली जातील. दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक आणि ठिकाण नंतर जाहीर केले जाईल.
हेही वाचा-
जसप्रीत बुमराह सिडनी कसोटीत एकाच वेळी अनेक विक्रम मोडणार, कपिल देवही मागे राहणार
IND VS AUS; सिडनी कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा, या अष्टपैलू खेळाडूला वगळले
धक्कादायक बातमी लीक! गौतम गंभीर नाही, हा दिग्गज खेळाडू होता मुख्य प्रशिक्षकपदासाठी पहिली पसंती