आयपीएल 2025 साठी मेगा लिलावाला आजपासून (24 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लावल्या जाऊ शकतात. लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असणार आहेत. ज्यावर संघ 20 कोटी रुपयांपर्यंत खर्च करू शकतात. तर मग या बातमीद्वारे जाणून घेऊया की, मेगा लिलावात असे कोणते खेळाडू आहेत, ज्यांच्यावर संघ मोठ्या बोली लावण्याची शक्यता आहे.
1- रिषभ पंत
गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या रिषभ पंतसाठी संघ 20 कोटी रुपये खर्च करण्यास तयार असू शकतात. आयपीएल 2025 मध्ये पंत सर्वात महागडा विकणारा खेळाडू देखील बनू शकतो. आता पंतला कोणता संघ किती किंमतीला खरेदी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
2- केएल राहुल
गेल्या मोसमापर्यंत केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसला होता. पण नंतर आता त्याला सोडण्यात आले. आता 2025 च्या आयपीएल मेगा लिलावात केएल राहुलवर मोठी बोली लागू शकते.
3- श्रेयस अय्यर
कोलकाता नाईट रायडर्सने श्रेयस अय्यरला रिलीज करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. अय्यरच्या नेतृत्वाखाली केकेआरने आयपीएल 2024 चे विजेतेपद जिंकले होते. त्यानंतर फ्रँचायझीने त्याला सोडले. अशा परिस्थितीत, मेगा लिलावात त्याला 20 कोटी रुपयांपर्यंत किंमत मिळण्याची शक्यता आहे.
4- जाॅस बटलर
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आयपीएल 2024 पर्यंत राजस्थान रॉयल्सचा भाग होता. यावेळी बटलर मेगा लिलावात मैदानात उतरणार आहे. बटलरसारख्या महान फलंदाजाला विकत घेण्यासाठी संघ मोठी बोलू लावू शकतात.
5- मोहम्मद शमी
मोहम्मद शमी आयपीएल 2024 पर्यंत गुजरात टायटन्सचा भाग राहिला. मात्र, दुखापतीमुळे तो 2024 चा हंगाम खेळू शकला नाही. पण शमी 2023 च्या आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला होता. आता शमी दुखापतीतून सावरला असून सध्या तो टीम इंडियाच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. अशा परिस्थितीत संघ शमीवर 20 कोटी रुपये खर्च करू शकतात.
हेही वाचा-
शतक एक रेकॉर्ड्स अनेक! 22 वर्षांच्या यशस्वीनं केली सचिन-गावस्करची बरोबरी
IND VS AUS; पर्थमध्ये तिसऱ्या दिवशीही खेळपट्टीचा रंग बदलला! टीम इंडियासाठी किती धावसंख्या सुरक्षित?
IND VS AUS; केएल राहुल-यशस्वी जयस्वालचा डंका! ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वोच्च सलामी भागिदारी