अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने यंदाच्या इराणी चषक स्पर्धेत शेष भारताचा पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयामुळे मुंबईचा 27 वर्षांचा दुष्काळ संपला. तब्बल 27 वर्षांनंतर ही ट्रॉफी जिंकण्यात मुंबई संघाला यश आले. संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीवर एमसीएने संघावर पैशांचा वर्षाव केला असून एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशन 27 वर्षांनंतर इराणी चषक जिंकणाऱ्या मुंबईच्या रणजी संघाला 1 कोटी रुपये देणार आहे. लखनऊ मागील येथे मागील आठवड्यात झालेल्या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील रणजी चॅम्पियन मुंबई संघाने इराणी ट्रॉफी जिंकली.
MCA ची मोठी घोषणा; अजिंक्य रहाणेच्या मुंबई संघावर पैशांचा पाऊस, 27 वर्षांचा दुष्काळ संपवल्याचं बक्षीस मिळालं
याआधी, मुंबईने शेवटचा हा ट्रॉफी 1997 मध्ये उर्वरित भारताला हरवून जिंकला होता. बीसीसीआयच्या 50 लाख रुपयांच्या बक्षीस रकमेव्यतिरिक्त, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभय हडप यांनी सोमवारी सत्कार समारंभात 1 कोटी रुपयांच्या अतिरिक्त बक्षीस रकमेची घोषणा केली.
भारतीय संघाकडून दीर्घकाळ खेळलेल्या अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईचे जुने दिवस परतताना दिसत आहेत. या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली संघाने रणजी ट्राॅफी जिंकला. रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाला इराणी कप जिंकण्यात यश आले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 साली घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत केले होते. पहिला कसोटी सामना हरल्यानंतर विराट कोहली मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला तेव्हा हा सामना पार पडला होता.
सर्फराज खान आणि तनुष कोटियन हे इराणी चषकात मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. सरफराजने पहिल्या डावात नाबाद 222 धावा केल्या. तनुषने पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावून मुंबईला अडचणीतून बाहेर काढले आणि सामना अनिर्णित राहिला आणि पहिल्या डावाच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला होता.
हेही वाचा-
ind vs ban; दुसऱ्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11, या खेळाडूचा होणार पत्ता कट?
Vinesh Phogat; पहिल्याच निवडणुकीत विनेश फोगट यशस्वी, भाजपाच्या उमेदावाराचा पराभव
IND vs BAN: दुसऱ्या टी20 साठी टीम इंडिया दिल्लीमध्ये दाखल; अश्या पद्धतीने झाले स्वागत