(Top run scorers in ICC Champions Trophy history) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी ही वनडे क्रिकेटमधील एक प्रतिष्ठित स्पर्धा असून, तिच्या प्रत्येक आवृत्तीत दिग्गज फलंदाजांनी शानदार कामगिरी करून आपली छाप उमटवली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात विविध खेळाडूंनी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात भिडले. ज्यात भारताने किवी संघाचा पराभव करत ट्राॅफी उंचावली. यंदाच्या चॅम्पियन्स ट्राॅफी मध्ये रचिन रवींद्र सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. तर या बातमीद्वारे जाणून घेऊयात की, आतापर्यंतच्या चॅम्पियन्स ट्राॅफीच्या प्रत्येक आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू कोण-कोण आहेत. (Champions Trophy highest run scorer year-wise)
1998 मध्ये पहिल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (त्यावेळी ‘ICC नॉकआउट’ म्हणून ओळखली जात होती) वेस्ट इंडिजचा फिलो वॉलेस हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने 221 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2000 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुलीने 348 धावा करून सर्वाधिक धावांचा मान पटकावला. या स्पर्धेत त्याने दोन शतके ठोकत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
2002 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवाग चमकला. त्याने 271 धावा करत सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. 2004 मध्ये इंग्लंडचा सलामीवीर मार्कस ट्रेस्कोथिकने 261 धावा करून आपले वर्चस्व गाजवले. तर, 2006 मध्ये वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने ऐतिहासिक कामगिरी करत 474 धावा फटकावल्या. हा विक्रम अजूनही कायम आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका हंगामातील सर्वाधिक धावा करण्याचा मान गेलच्या नावावर आहे.
पुढे 2009 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने 288 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिले. 2013 आणि 2017 या दोन आवृत्त्यांमध्ये भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सर्वोत्तम ठरला. 2013 मध्ये त्याने 363 धावा केल्या, तर 2017 मध्ये 338 धावा करून भारताला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
यंदाच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास रचिन रवींद्रने सर्वाधिक धावा केल्या. त्याने एकूण 4 सामन्यात 263 धावा केल्या. त्याने न्यूझीलंडला फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी निर्णयाक भूमिका बजावली. या चमकदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या प्रत्येक आवृत्तीत सर्वाधिक धावा करणारे (Most runs in a single edition of Champions Trophy)
1998 – 221 धावा – फिलो वॉलेस
2000 – 348 धावा – साैरव गांगुली
2002 – 271 धावा – वीरेंद्र सेहवाग
2004 – 261 धावा – मार्कस ट्रेस्कोथिक
2006 – 474 धावा – ख्रिस गेल
2009 – 288 धावा – रिकी पाँटींंग
2013 – 363 धावा – शिखर धवन
2017 – 338 धावा – शिखर धवन
2025- 263 धावा – रचिन रवींद्र
हेही वाचा-
आजपर्यंतच्या सर्व चॅम्पियन्स ट्रॅाफी विजेत्यांची यादी! पहा एका क्लिकवर
हिटमॅन’चा धमाका; आयसीसी स्पर्धेत पहिले अर्धशतक






