आज, रविवार (4 ऑगस्ट) रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा नववा दिवस असेल. आतापर्यंत झालेल्या 8 दिवसांच्या खेळांमध्ये भारताने एकूण 3 पदके जिंकली आहेत. आज पुन्हा एकदा सर्व भारतीय खेळाडू वेगवेगळ्या खेळांसाठी मैदानात उतरणार आहेत. आज भारतीय खेळाडू पदके आपल्या झोळीत टाकण्यासाठी मैदानात उतरतील.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील नववा दिवस भारतासाठी सुपर संडे ठरू शकतो. कारण रविवारी अनेक महत्त्वाचे सामने पाहायला मिळणार आहेत. यातील पहिला महत्त्वाचा सामना म्हणजे भारतीय हॉकी संघ क्वार्टरफायनलमध्ये ग्रेट ब्रिटनविरुद्ध खेळणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास ते पदकाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल टाकणार आहेत. दुसरा महत्त्वाचा सामना म्हणजे बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन सेमीफायनल खेळणार आहे. त्याने हा सामना जिंकला तर तो पदक निश्चित करेल, तर हरला तरी त्याला कांस्य पदकाचा सामना खेळण्याची संधी असणार आहे. याशिवाय लवलिना बोर्गोहेनही बॉक्सिंगमध्ये क्वार्टरफायनलमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तिनेही विजय मिळवला, तर ती देखील मेडल निश्चित करेल.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे आजचे (04 ऑगस्ट) वेळापत्रक
शूटिंग
पुरुष 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पात्रता पहिली फेरी: विजयवीर सिद्धू आणि अनिश: दुपारी 12:30 नंतर
पुरुषांची 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल पात्रता दुसरी फेरी: विजयवीर सिद्धू आणि अनिश: दुपारी 4:30 नंतर
महिला स्कीट पात्रता फेरी दुसरा दिवस: रजा ढिल्लोन आणि माहेश्वरी चौहान: दुपारी 1:00 वा.
गोल्फ
पुरुषांचा वैयक्तिक स्ट्रोकप्ले: चौथी फेरी शुभंकर शर्मा आणि गगनजीत भुल्लर: दुपारी 12:30 वाजता
हॉकी
भारत विरुद्ध ग्रेट ब्रिटन पुरुष हॉकी उपांत्यपूर्व फेरी: दुपारी 1:30 वाजता
ऍथलेटिक्स
महिलांची 3000 मीटर स्टीपलचेस पहिली फेरी: पारुल चौधरी: दुपारी 1:35 वाजता
पुरुषांची लांब उडी पात्रता: जेसन ऑल्ड्रिन: दुपारी 2:30 वाजता
बॉक्सिंग
महिला 75 किलो उपांत्यपूर्व फेरी: लोव्हलिना बोर्गोहेन विरुद्ध चीनची ली कियान: दुपारी 3:02 वाजता
बॅडमिंटन
पुरुष एकेरी उपांत्य फेरीतील लक्ष्य सेन विरुद्ध व्हिक्टर एक्सेलसेन (डेनमार्क) दुपारी 3:30 वाजल्यापासून
नौकानयन
पुरुषांची डिंगी शर्यत सात आणि आठ: विष्णू सरवणन, दुपारी 3.35 वाजल्यापासून
महिला डिंगी शर्यत सात आणि आठ: नेत्रा कुमनन, संध्याकाळी 6.05 वाजता
हेही वाचा-
ईशान किशन क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज, लवकरच करणार या संघातून पुनरागमन
पहिला सामना टाय, दोन्ही संघांसाठी ‘मालिका करा किंवा मरा’ स्थितीत, पाहा कोणचं पारडं जड?
यजमानांनच वरचढ! ही चूक सुधारली नाही तर श्रीलंका करु शकते चितपट, टीम इंडियासमोर मोठे आव्हान