आत्तापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंवर बायोपिक बनवले गेले आहेत. ज्यामध्ये एमएस धोनीवर बनलेला सुशांत सिंगने केलेला बायोपिक सर्वाधिक हिट ठरला होता. याशिवाय मोहम्मद अझरुद्दीन आणि भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज यांच्याही बायोपिक बनवण्यात आल्या आहेत. अलीकडेच माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगच्या बायोपिकचीही घोषणा करण्यात आली आहे. तर आगामी काळात रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील या हिस्याचा भाग असण्याची शक्यता नाकरता येत नाही.
टीम इंडियाचा माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या बायोपिकबाबतही अनेकदा चर्चा झाली आहे. नुकतेच एका अवॉर्ड शोदरम्यान त्याला याबाबत विचारण्यात आले होते. राहुल द्रविडला विचारण्यात आले की, जर त्याच्यावर चित्रपट बनला तर त्याला कोणत्या अभिनेत्याच्या भूमिकेत पाहायला आवडेल. यावर राहुल द्रविडने अतिशय मजेशीर उत्तर दिले आहे.
या भूमिकेसाठी जास्त पैसे मिळाले तर मी स्वत: त्याची भूमिका साकारण्यास तयार असल्याचे राहुल द्रविडने सांगितले. द्रविडने गंमतीने सांगितले की, जर मला जास्त पैसे मिळाले तर मला स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल.
Question: Who will play Rahul Dravid in a Biopic? [CEAT Awards]
Rahul Dravid said “If the money is good enough, I will play the role”. (Big smile) pic.twitter.com/umEEGydi4F
— Johns. (@CricCrazyJohns) August 21, 2024
भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविडचे योगदान मोठे आहे. त्याने आपल्या काळात टीम इंडियासाठी अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या. पाकिस्तानविरुद्धची रावळपिंडी कसोटी असो किंवा ॲडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळलेली 233 धावांची खेळी असो, अनेक वेळा द्रविडने भारतासाठी समस्यानिवारणाची भूमिका बजावली. द्रविड जेव्हा खेळाडू म्हणून निवृत्त झाला तेव्हा त्याने भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी प्रशिक्षक म्हणून काम केले.
राहुल द्रविडने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) युवा क्रिकेटपटूंचे पालनपोषण केले. याशिवाय त्याच्या प्रशिक्षणाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्वचषक जिंकला. यानंतर तो वरिष्ठ संघाचा प्रशिक्षक बनला. आणि भारताला टी20 विश्वचषक विजेतेपद मिळवून दिले. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणातच भारताचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ 11 वर्षांनंतर संपला.
हेही वाचा-
रोहित-कोहलीसोबत यशस्वीलाही मिळाला पुरस्कार, जाणून घ्या यादीत कोणा-कोणाचा समावेश
IPL Mega Auction 2025: आरसीबी ‘या’ स्टार खेळाडूंना संघात कायम ठेवणार?
“उसेन बोल्टवर बंदी…” ऑलिम्पिकच्या लिंग वादावर बाॅलिवूड अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य!