---Advertisement---

रवींद्र जडेजाची रणजी ट्राॅफीत कहर कामगिरी, ठरला सामनावीरचा मानकरी, संघाचा एकतर्फी विजय 

---Advertisement---

रणजी ट्रॉफीच्या एलिट ग्रुप-डी मध्ये सौराष्ट्र संघाने दिल्लीविरुद्धच्या सामन्यात फक्त 2 दिवसांत 10 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला आहे. या सामन्यात, सौराष्ट्र संघाकडून खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने उत्तम कामगिरी केली आहे. ज्यात त्याने पहिल्या डावात 5 बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावातही जडेजाने आपली लय कायम ठेवली आणि 7 बळी घेतले. संघाला एकतर्फी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली संघाने सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अतिशय खराब फलंदाजी केली.

रवींद्र जडेजाच्या शानदार गोलंदाजीमुळे दिल्लीचा पहिला डाव फक्त 188 धावांवर संपुष्टात आला. तर सौराष्ट्रने पहिल्या डावात एकूण 271 धावा केल्या. ज्यामुळे पहिल्या डावाच्या आधारे त्यांना महत्त्वाची आघाडी मिळाली. दिल्ली संघाच्या दुसऱ्या डावात, त्यांचे फलंदाज संघर्ष करताना पाहायला मिळाले. ज्यामध्ये संपूर्ण संघ फक्त 94 धावा करू शकला. रवींद्र जडेजाने दुसऱ्या डावात 12.2 षटके टाकली. ज्यात 38 धावा देत 7 बळी घेतले. अशाप्रकारे, जडेजाने सामन्यात एकूण 12 विकेट्स घेतल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जडेजाने एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याची ही 10वी वेळ आहे.

सौराष्ट्र विरुद्धच्या या सामन्यात दिल्ली संघाकडून टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतही खेळत होता. पहिल्या डावात फक्त एक धाव काढल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. तर दुसऱ्या डावातही तो फ्लाॅप ठरला. ज्यात त्याला केवळ 17 धावा करता आल्या. अशाप्रकारे, या सामन्यात रिषभ पंतला फक्त 18 धावा करता आल्या. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी हे निश्चितच चिंतेचे कारण आहे.

हेही वाचा-

आयसीसीकडून मागील वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघाची घोषणा, विराट-रोहितला जागा नाही
आयसीसीचा महिला वनडे संघ जाहीर, या 2 भारतीय खेळाडूंना मिळालं स्थान
रणजी सामन्यात गोंधळ, खराब अंपायरिंगमुळे अजिंक्य रहाणे भडकला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---