2016 च्या Rio Olympic मध्ये U.S. ची टीम प्रथम क्रमांकावर आहे यापेक्षा Great Britain ची टीम चीन ळा मागे टाकून दुसऱ्या क्रमांकावर आली ही बातमी महत्वाची आहे आणि यामागे कारण ही तसच आहे. 1996 च्या Atlanta Olympics मध्ये फक्त एका गोल्डसह 36 व्या स्थानापासून 20 वर्षात 27 गोल्ड मिळवून दुसऱ्या स्थानावर पोहचण्याचा प्रवास हा एका well planned योजनेच यश आहे.
1990 च्या दशकातल GB मधील खेळाबाबतच जवळपास सर्व वातावरण हे इंग्लंड च्या राष्ट्रीय फुटबॉल टीम भोवती एकटवलेल होत.फुटबॉल संघाच्या यशापयशापलिकडे जनभावना पोहचत नव्हती आणि अशातच 1996 च्या Olympics मध्ये GB चा दारुण पराभव झाला.यूरोप मधील अनेक छोटे देश पदक तक्त्यात त्यांच्या पुढ गेले. या अपयशातूनच GB मधे 1997 ला World Class Performance Programme जाहीर करण्यात आला. National Lottery तून सरकारला मिळणारे सर्व उत्पन्न या योजनेकड़े वळवण्यात आले. या योजनेच उद्दीष्टच ठरवण्यात आल होत की Olympics मधे मेडल आणि Paraolympics मधे Gold मेडल मिळवण. आणि याचे रिझल्ट पण आपल्याला Rio मधे दिसून आले. Paraolympics मधे देखील GB च्या टीम ने आत्तापर्यंत 58 गोल्ड मिळवले आहेत.
सध्या आपला देश देखील GB च्या 90 च्या परिस्थितून जात आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या पलिकडे आपणही बघायला तयार नाही. 2016 च्या olympics मधल जे काही यश आहे ते त्या खेळाडूंच वैयक्तिक यश प्रयत्न आहेत. संस्थात्मक वा कुठल्याही राजकीय धोरणांचा यात समावेश दिसत नाही. भारताने देखील 1998 ला National Sports Development Fund निर्माण केला आहे पण इतर अनेक योजनांप्रमाणे ही देखील फक्त सरकारदप्तरीच सुरु आहे.
पण 2016 च्या Olympics नंतर आपल्याकडे देखील काही सकारात्मक गोष्टी घडत आहेत.पंतप्रधानांनी पुढील 3 Olympics डोळ्यासमोर ठेवून एका Task Force ची निर्मिती केलि आहे. याची कार्यपद्धती अजून जाहीर झाली नसली तरी GB च्या WCPP योजनेतील काही मुद्द्यांशी साम्य राखून आपल्याला देखील पुढील Olympics साठी तयारी करता येईल.
सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खेळासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात खाजगी क्षेत्राचा वापर करून घेतला पाहिजे. मेडल मिळवल्यानंतर त्या खेळाडूंवर बक्षीसांचा वर्षाव करण्यापेक्षा त्यांच्या तयारीवर हा पैसा खर्च झाला पाहिजे.सरकारने हस्तक्षेप करून खाजगी क्षेत्राला यात समाविष्ट करून घेतल पाहिजे.
GB ने आपल्या WCPP योजनेतील प्रत्येक निवड समितीत माजी खेळाडूंना उच्च स्थान दिल आहे. आपल्याला देखील क्रीड़ामंत्रालयापासून जिल्हा निवड समितिपर्यंत आजी-माजी खेळाडूंना समाविष्ट करून घ्यायला लागेल.खेळाला काम समजण्यापेक्षा खेळावर प्रेम असणाऱ्या माणसांच्या हातात ही सर्व व्यवस्था दयायला लागणार आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा आहे एखादा खेळप्रकार dominate करणे. US च्या टीमला स्विमिंग मधे 16 गोल्ड आहेत तर GB ने सायकलिंग मधे 11 गोल्ड मिळवले आहेत.आपल्या देशात सुद्धा कुस्ती,बॅडमिंटन,नेमबाजी हे खेळ dominate करण्याची क्षमता आहे फक्त या दृष्टीने आपल्याला स्वतंत्र पावले टाकावी लागतील. पी.गोपीचंद सारख्या अकादमी नी आपल्याला सलग 2 Olympics मधे पदके मिळवून दिली आहेत,कुस्तीसाठी तालमींचा प्रसार सर्वत्र आहे. आधीच structure तयार असणाऱ्या या संस्थाना आता बळ देण गरजेच आहे.
भारतात देखील आता खेळसंस्कृती रुजत आहे. भारतीय जनता खेळाकड़े व्यावसायिक दृष्टया बघत आहे. Talent च्या बाबतीत बोलायच तर दिपा कर्माकर(जिम्नास्टिक), ललिता बाबर(स्टिपलचेस), दत्ता भोकनळ(रोइंग) यांची उदाहरणे आहेतच. तांत्रिक दृष्टया अत्यंत अवघड खेळात वरील खेळाडूंनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवले आहे.
लोकांचा पाठींबा आणि प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती यांच्या मदतीने येत्या Olympics मध्ये भारत देखील पदक तक्त्यात आपल्याला पहिल्या 10 त दिसू शकतो.