रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ यंदाचा टी20 विश्वचषक जिंकला. तर आता चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्माने भविष्यात भारतासाठी आणखी सामने आणि ट्रॉफी जिंकण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बुधवारी (21 ऑगस्ट) झालेल्या सीएट क्रिकेट अवॉर्ड्समध्ये त्याने हे उघड केले आहे. ज्यामध्ये तो वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकण्यात यशस्वी ठरला.
🚨🔴 CAPTAIN ROHIT SHARMA HAS WON THE – CEAT CRICKETER OF THE YEAR AWARD 🏅.
Hitman – The 🐐. pic.twitter.com/NIYuGBXXV1
— 𝓐𝓭𝓲 🇮🇳 (@ImAdiRo_) August 22, 2024
रोहित शर्माने त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन बनवले. मात्र, गेल्या वर्षी त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात अपयशी ठरला होता. पण रोहितने हार मानली नाही. अखेर या वर्षी भारताला दुसऱ्यांदा टी20 चॅम्पियन बनवण्यात यश मिळविले.
अवॉर्ड शोमध्ये याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला, ‘मी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यामागे एक कारण आहे. मी थांबणारा नाही, कारण एकदा का तुम्हाला सामने जिंकण्याची, कप जिंकण्याची चव चाखायला मिळाली की, तुम्ही थांबायला नको. आम्ही एक संघ म्हणून पुढे जात राहू. भविष्यात आणखी चांगल्या गोष्टींसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू.
तो पुढे म्हणाला की, आगामी काळात आपल्याला महत्त्वाच्या दौऱ्यांवर जायचे आहे, तेही खूप आव्हानात्मक असेल. एकदा आपण काहीतरी साध्य केले की आपण नेहमी अधिकाधिक गोष्टी साध्य करण्यासाठी उत्सुक असतो. हे मी करणार आहे. मला खात्री आहे की माझे सहकारी खेळाडू देखील असाच विचार करत असतील. गेल्या दोन वर्षांत मी भारतीय क्रिकेटमध्ये जे पाहिलं आहे. ते म्हणजे खरंच खेळाबद्दल खूप उत्साह आहे. खूप चांगले क्रिकेट खेळले जात आहे.
आगामी काळात टीम इंडियाला आयसीसीच्या दोन मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये होणार आहे, ज्याचे यजमानपद पाकिस्तानकडे असेल. भारतीय संघाने शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 मध्ये जिंकली होती. याशिवाय पुढील वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतिम सामनाही खेळवला जाणार आहे. याआधीच्या दोन्ही टप्प्यात भारतीय संघ शेवटच्या टप्प्यात जेतेपदाला मुकला होता. यावेळी रोहित शर्माची सेना फायनलमध्ये धडक मारुन जेतेपद पटकावण्यासाठी नक्कीच आग्रेसर असेल.
हेही वाचा-
रोहित शर्मासाठी सप्टेंबर महिना ऐतिहासिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रचणार महान विक्रम
देशाचं दुर्दैव! ऑलिम्पिकमधील स्टार खेळाडूचा खेळाला अचानक रामराम, काय आहे कारण?
टी20 विश्वचषकाच्या विजयात या तीन खेळाडूंनी बजावली सर्वात महत्त्वाची भूमिका, रोहित शर्माचा खुलासा