---Advertisement---

RR vs CSK: ‘हा’ ठरला राजस्थानच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल हंगामातील अकरावा सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात गुवाहाटीतील बारसापारा स्टेडियमवर खेळवण्यात आला. राजस्थानने हा सामना 6 धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने २० षटकांत 9 गडी गमावून 182 धावा केल्या. ज्यात नितीश राणाने सर्वाधिक 36 चेंडूत 81 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवातही फारशी खास नव्हती. पहिल्याच षटकात जोफ्रा आर्चरने रचिन रवींद्रला विकेटमागे झेलबाद केले, तो शून्यावर बाद झाला. यानंतर राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांच्यात 46 धावांची भागीदारी झाली. जोपर्यंत हे दोघे फलंदाजी करत होते, तोपर्यंत चेन्नई सामन्यावरील आपली पकड मजबूत करत असल्याचे दिसत होते. पण हसरंगाने राहुल त्रिपाठीला बाद करून सीएसकेला मोठा धक्का दिला.

राहुल त्रिपाठीनंतर फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने 10 चेंडूत 18 धावा केल्या आणि विजय शंकर 6 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. यानंतर, ऋतुराज गायकवाड एका टोकापासून सातत्याने चांगली फलंदाजी करत होता, पण तोही 44 चेंडूत 63 धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना संदीप शर्माच्या पहिल्याच चेंडूवर एमएस धोनी 16 धावांवर बाद झाला. मोक्याच्या क्षणी त्याची विकेट गेल्याने राजस्थानने सामना जिंकला. रवींद्र जडेजाने 22 चेंडूत 32* धावा केल्या. गोलंदाजीत वानिंदू हसरंगा सर्वात यशस्वी ठरला, त्याने या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---