आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी (24 जुलै) आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2018 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले होते.
या स्पर्धेत भारतीय संघाला सलग दोन दिवस दोन सामने खेळावा लागणार आहे. भारतीय संघ 18 सप्टेंबरला पात्रता फेरीतून आलेल्या संघाविरुद्ध तर 19 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध सामना खेळावा लागणार आहे.
या सलग दोन दिवस असलेल्या सामन्यांमुळे भारतीय संघाला कोणतीही विश्रांती मिळणार नाही.
आयसीसीने भारताचे सलग दोन दिवस सामने ठेवल्यामुळे भारताचा माजी उपकर्णधार आणि सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने या ढिसाळ नियोजनामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होऊ नये असे मत व्यक्त केले आहे.
“कोणत्याही क्रिकेटपटूला एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरामाची गरज असते. असे असतानाही भारताला आशिया चषकात सलग दोन दिवस सामने खेळायचे आहेत. माझे स्पष्ट मत आहे की, भारतीय संघाने या स्पर्धेत सहभागी न होता पुढील मालिकेसाठी तयारी करावी.” असे मत सेहवागने व्यक्त केले.
15 सप्टेंबर 2018 पासून सुरु युएई येथे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. यास्पर्धेमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत.
महत्त्वाची बातम्या-
-टीम इंडियात लवकरच पदार्पण करणार नवा रोहित शर्मा!
-सेहवाग, गंभीर आणि आकाश चोप्रा पुन्हा एकत्र, खेळणार नवीन इनिंग