---Advertisement---

SRH vs KKR: ‘हा’ खेळाडू ठरला केकेआरसाठी नाईटमेयर, हैदराबादचा ऐतिहासिक विजय

On: सोमवार, मे 26, 2025 7:28 AM
---Advertisement---

आयपीएल 2025च्या 68व्या सामन्यात (IPL) सनरायझर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सचा दारुण पराभव केला. (SRH vs KKR) हा सामना एकतर्फी हैदराबादच्या नावे राहिला. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकात एसआरएचने 278 धावा केल्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून केकेआरला केवळ सर्व गडी गमावून 18.4 षटकात 168 धावा करता आल्या. (SRH BEAT KKR BY 110 RUNS) आशा प्रकारे सनरायझर्स हैदराबादने 110 धावांनी सामना जिंकला. हैदराबादने आयपीएलच्या या 18व्या हंगामाचा शेवट विजयाने केला आहे.

हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हेनरिक क्लासेन वेगळ्याच शैलीत फलंदाजी करण्यासाठी आला. क्लासेनने 39 चेंडूत 105 धावांची शानदार नाबाद खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. क्लासेन हैदराबादसाठी सर्वात जलद शतक करणारा खेळाडू ठरला. क्लासेनचा हा शतक आयपीएलच्या इतिहासातील तिसरा सर्वात जलद शतक आहे. हेनरिक क्लासेनच्या विस्फोटक खेळी समोर केकेआरचे गोलंदाज हतबल होताना दिसले. Heinrich Klaasen Century

कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी हैदराबादचा हा धावसंख्या गाठण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना एसआरएच गोलंदाजांसमोर गुडघे टेकावे लागले. कोलकाताकडून मनीष पांडेने सर्वाधिक (37) धावा केल्या. हैदराबादकडून हर्ष दुबे, जयदेव उनाडकट आणि इशान मलिंगा यांनी 3-3 बळी घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---